राष्ट्रीय चर्मकार महासंघाची संत रविदास भवन बांधण्यासाठी १० लाख रु. निधी मागणी आमदार चव्हाण यांनी दिली तात्काळ मंजुरी…

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे, तालुका कार्यकारणी चाळीसगाव, जिल्हा जळगाव,मौजे कळमडू गावातील संत रविदास भवन बांधण्यासाठी १० लाख रु. निधी मंजूर करण्यासाठी लोकप्रिय आमदार, श्री. मंगेशदादा चव्हाण, चाळीसगाव यांच्या बरोबर दी. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, समाजाच्या व्यथा, अडचणी समजून घेऊन आमदार चव्हाण यांनी १० लाख रु. निधी मंजुरीस तात्काळ मान्यता दिली आहे,तसेच येत्या दीड महिन्यामध्ये १० लाख रु. निधी बाबत शासन स्थरावरून जी. आर. काढून देण्याचे संत रविदास समाजाला ( कळमडू) गावातील चर्मकार समाजातील लोकांसमोर जाहीरपणे आश्वासन दिलेले आहे.
यावेळी अध्यक्ष ईश्वरलाल आहिते ,प्रशांत विनायक देवरे,( तालुका कार्यकारणी सदस्य),संजय देवरे, पंकज एकनाथ मोरे, विवेक हसरथ मोरे ,अमोल रमेश मोरे, शरद वाल्मिक मोरे, सुनिल महादु मोरे, रवींद्र साहेबराव मोरे, राहुल भिमराव मोरे, सोपान राजेंद्र विसावे, योगेश ज्ञानेश्वर देवरे, देविदास भिका मोरे, भूषण प्रकाश देवरे, भाईदास पुंडलिक मोरे, विनायक नारायण देवरे, प्रशांत देवराम मोर, सचिन शामराव मोर, प्रशांत देवराम मोरे, पंढरीनाथ तुकाराम देवरे,दयाराम सोनवणे व एम बी लाड सर आदी समाज बांधव उपस्थित होते.