रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त व रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-27 जुलै रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त व रिपाइं ए चे राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड शहर व तालुक्यात विविध उपक्रम करून साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये रिपाइं ए चे दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात दि 21 जुलै 2022 रोजी दौंड शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी 100 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले 22 जुलै 2022 रोजी दौंड चे ग्रामीण रुग्णालय येथे फळे बिस्किटे वाटप करण्यात आले आहे, 23 जुलै 2022 रोजी स्व असुदामल नारंग शाळेमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा मा मुख्याध्यापक खंडागळे सर व मा सुनील गायकवाड सर व शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पार झाल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण आज दि 24 जुलै 2022 रोजी 1 ला 2 रा 3 रा चित्रकला 1 ला 2 रा 3 रा निबंध व 1 उत्तेजनार्थ असे 7 विद्यार्थ्यना ट्रॅफि व प्रमाणपत्र व सर्व सहभागी 150 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी रिपाइं ए अध्यक्ष सचिन भाऊ खरात म्हणाले की विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संदेश समस्त भारत वर्षेला दिला आहे की शिका संघटित व्हा आणि जिथे अन्याय तिथे संघर्ष करा हाच बाबासाहेबांचा मूलमंत्र घेऊन आपला पक्ष संघटना कार्य करत आहे आणि येणाऱ्या काळात शैक्षणिक आणि हॉस्पिटल संदर्भी कोणास काही अडचण येत असेल तर आम्हला येऊन भेटा त्यांना आमच्या आपल्या संघटनेकडून पक्षाकडून मदत होईल, रिपाइं चे युवानेते शशांक गायकवाड, मुख्यध्यापक खंडागळे सर शिक्षक सुनील गायकवाड सर यांनी ही मनोगत व्यक्त केले, त्यासमयी मुस्लिम आघाडी अध्यक्ष फिरोज भाई तांबोळी, रिपाइं दौंड तालुका उपाध्यक्ष रामभाऊ देवडे, रिपाइं चे युवानेते अनिकेत भाऊ रणसिंग DBN ग्रुप चे राज गायकवाड रिपाइं चे अनिकेत सवाने, रिपाइं उपाध्यक्ष ईश्वर सांगळे,रिपाइं चे राजेश ठाणेदार रिपाई चे सागर गुंडेल्लू रिपाई युवा चे कार्याध्यक्ष सनी गायकवाड रिपाई चे राकेश काळे रिपाई युवानेते आकाश वाघमारे, रिपाइं चे मिलिंद गायकवाड रिपाइं ए युवा उपाध्यक्ष अजित भालेराव रिपाइं चे संजय घाडगे, सागर बेंगळे, प्रबोधन सांगळे,यांच्या उपस्थितीत सर्व उपक्रम पार पडला