अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी दि 21)-रिपब्लिकन श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य,नगरपालिका/ नगरपंचायत कामगार संघटना दौंड, शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, सचिव विशाल ओव्हळ व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल पाळेकर तसेच सर्वच सफाई कामगारवर्ग , दौंड नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांच्यामार्फत दौंड नगरपालिकेमध्ये कामगारांच्या विविध समस्यांबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी
सौ.निर्मला राशीनकर आणि नगराध्यक्षा सौ.शितल कटारिया यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. दीपावलीला सुरुवात होत आहे त्यामुळे दरवर्षी दिवाळीला सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या घराविषयी देखील चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी यांनी शासनाने सांगितल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाची उंची वाढवली पाहिजे त्याप्रमाणे पुढील काळात सफाई कामगारांच्या हक्काच्या घरासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल व कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी तसेच त्याच्या आरोग्याविषयी मांडलेल्या प्रश्नांबाबत लवकरात लवकर आणि चांगल्यात चांगली ज्याचा कुटुंबाला देखील फायदा होईल अशी कौटुंबिक मेडिकल पॉलिसी काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. लवकरात लवकर यावर चर्चा करून हा प्रश्नदेखील मार्गी लावू असे सांगितले. तसेच अशा विविध चर्चांसाठी सफाई कामगारांनी वेळ मागितला असता, नगरपालिकेचा कर्मचारी-अधिकारी स्वतंत्रपणे येऊन आपली समस्या आणि मत मांडू शकतो त्यासाठी कोणत्याही अर्जाची किंवा वेळ मागायची गरज नाही. त्यामुळे माझ्याकडे कोणीही अर्ज करून वेळ मागू नये असे या चर्चेच्या वेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.
यानंतर सदरच्या विषयांबाबत मुख्यधिकारी यांना व नगराध्यक्ष यांना कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे निवेदन दिले.