रेल्वे स्टेशनजवळ विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती स्मारक झाले पाहिजे-समता सैनिक दल

0 0
Read Time2 Minute, 34 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगांव(प्रतिनिधी)-भारतीय संविधानाचे जनक, सार्वभौम भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे प्रणेते, भारतीय स्त्री स्वातंत्र्याचे जनक, देशातील ८५% लोकसंख्या असलेल्या एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. तील सहा हजार जातींना समता बहाल करणारे, भारतातील करोडो सर्वसामान्य जनतेचे उध्दारकर्ते विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती स्मारक (पुतळा) चाळीसगाव शहरात, रेल्वे स्टेशनजवळ झाले पाहिजे अशी समस्त चाळीसगावकरांची मागणी आहे. अद्याप या मागणीची चाळीसगाव नगर परिषदेने गंभीर दखल घेतलेली नाही. अनेकवेळा चाळीसगाव येथे भेटी दिल्या आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच सन १९२९ साली अस्पृश्योध्दारक बोर्डिंग चालू करण्यात आली होती.
चाळीसगाव येथील आठवणी या महामानवाने स्वतः भाषणातून सांगितलेल्या आहेत. अशा या चाळीसगाव नगरीत या महापुरुषाचे भव्य स्मारक होणे गरजेचे आहे. यामुळे चाळीसगाव नगरीच्या वैभवात भर पडणार असून त्यांचे पुर्णाकृती स्मारक सर्वांना प्रेरणादायी असणार आहे. राष्ट्रीय समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवनींना उजाळा देत बोलत होते

तसेच धर्मभूषण बागूल यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले यावेळी यावेळी तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव,तालुका सचिव बाबा पगारे,जिल्हा सचिव भाईदास गोलाईत,जिल्हा संघटक पितांबर झाल्टे,राजरत्न जाधव,विष्णू जाधव,मनोज जाधव,नितीन मरसाळे,अजय पगारे,महेंद्र जाधव,रवींद्र मोरे,शुभम निकम,गौतम मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.