Read Time1 Minute, 21 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह

रोटरी क्लब अंतर्गत असलेल्या
रोटरॅक्ट क्लब ऑफ चाळीसगाव क्लासिकच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा आकाश पोळ यांची निवड करण्यात आले आहे.क्लबने माघील वर्षी वृक्षरोपण,आरोग्यशिबिर, व कोरोनाच्या काळामध्ये अनेक गरजु निराधार,बेरोजगार, विधवा व बेघर कुटूंबाना सामजिक भान राखत किराणाच्या माध्यमातून मदत केली व तसेच अनेक सामजिक उपक्रम देखील घेतले. कामाची दखल घेत पुन्हा फेर निवड करण्यात आले.रोटरी क्लब मध्ये अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या व वरिष्टाच्या मार्गदर्शन लाभले डॉ.संदिप देशमुख, अध्यक्ष-रोटरी क्लब,रोशन ताथेट यांचे आभार आकाश पोळ यांनी मानले
तसेच उपअध्यक्ष पदी महेंद्र कुमावत तर सचिव पदी हर्षल माळी,खजिनदार प्रणाल पवार ,सहसचिव प्रेरणा रोकडे यांची निवड करण्यात आली.
