अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव लोकसभा मतदार संघातील रोहयो कामकाजासंदर्भात आढावा बैठक संपन्न : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी खासदार उन्मेश दादा यांनी साधला संवाद
जळगाव — घरकुल गाय गोठा शेड/ शेळी पालन शेड / कुकुटपालन शेड यांची ची किती कामे झालीत या कामांवर किती जणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला एवढेच नव्हे तर एप्रिल 2021 ते मार्च 2022 यासाठी लेबर बजेट बनवावे यात ग्रामसेवक सरपंच यांची ट्रेनिंग घेऊन शिवार फेरी आयोजित करून कोणती कामे घ्यावेत कोणती कामे घेऊ नयेत याबाबत मार्गदर्शन घेण्यात यावे.
ग्रामसेवक सरपंच यांच्या सात तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करून येत्या काळात शोषखड्डा व सांडपाणी व्यवस्थापन, रुफ वाटर हार्वेस्टिंग, युरीन कलेक्शन (गोमुत्र कलेक्शन) , शाश्वत उत्पन्नासाठी माझा बांध माझे झाड तसेच घनकचरा व्यवस्थापन, व्हर्मीकंपोस्ट, अभिसरणातून अकुशल कुशल निधीतून साखळी पद्धतीने बंधारे या सारखे उपक्रम “रोहयो”तून राबवून पर्यावरण पूरक दुप्पट उत्पन्न देणारी शाश्वत शेतीतून आत्मनिर्भर शेतकरी तयार व्हावेत असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
जळगाव लोकसभा मतदार संघातील रोहयो कामकाजासंदर्भात आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपन्न झाली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी यावेळी मार्गदर्शक सूचना केल्या. रोहयोचे उप जिल्हाधिकारी राहुल बोटे यांनी बैठकीचे संचालन केले. शेवटी आभार मानले. यात पाचोरा, भडगाव, जळगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल,धरणगाव, चाळीसगाव या सर्व तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी खासदार उन्मेश दादा यांनी संवाद साधला. अंमळनेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ , चाळीसगाव गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी काही लक्षवेधी सूचना मांडल्या.