अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-कचरा कुंडीत आढळले मुलीचे अर्भक सामाजिक कार्यकर्ते अशोक मारुती शिंदे यांनी केला गुन्हा दाखल
संपूर्ण माहिती अशी की सामाजिक कार्यकर्ते
अशोक मारुती शिंदे वय.38 वर्षे रा वडारगल्ली वैदुवस्ती
परीसर ता दौंड जि पुणे येथे कुंटुबासह राहण्यास असुन रिक्षा चालवुन उदरनिर्वाह करतात तसेच दौंड शहरामध्ये
सामाजिक कार्य करीत असतात आज ता 09 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाचे सुमारास घरातील कामे उरकुन जगदाळे हॉस्पीटल ता दौंड जि पुणे येथे जाण्यासाठी निघाले त्यावेळी वडारगल्ली येथील मिशन हॉस्पीटल च्या कंपाउंड वॉल जवळील कचरा कुंडीजवळ काही लोक थांबले होते व ते तेथे का थांबले आहेत म्हणुन तेथे जवळ गेले असता चौकशी केली व बारकाईने पाहणी केली असता सदर कचरा कुंडीच्या बाजुला एक प्लॅस्टीकची बरणी टाकलेली दिसली सदर बरणी वर निळे रंगाचे प्लॅस्टीकचे झाकण होते त्यामध्ये सुमारे 3 ते 4 महीन्याची लहान मुलींचा अर्भक बरणीत दिसुन आले सदर बरणीची पाहणी केली असता त्यामध्ये एक लहान मुलीचा अर्भक दिसले व त्याचे नाळीस काहीतरी बांधलेले दिसले ते कोणीतरी अज्ञात स्त्रीने गर्भस्त्राव घडवुन आणुन अजात गर्भजीवास दुखापत पोहचवुन त्यास प्लॅस्टीकची बरणीत बंद करुन उघड्यावर टाकुन निघुन गेली आहे म्हणुन अज्ञात स्त्री विरुध्द तक्रार देण्यासाठी दौंड पोलीस स्टेशन येथे तक्रार देत 9 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजेस अज्ञात स्त्रीने गर्भस्त्राव घडवुन आणुन अजात 3 ते 4 स्त्री जातीचे गर्भजीवास दुखापत पोहचवुन त्यास प्लॅस्टीकची बरणीत बंद करुन उघड्यावर टाकुन निघुन गेली आहे अशी तक्रार देत दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन ला कलम 312 नुसार स्त्री भ्रूण हत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पी एस आय आबनावे हे करीत आहेत