लाखो रुपयांना गंडविणाऱ्या तीन ठगांना शहर पोलिसांनी केली अटक…

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
आरोपी संभाजी दगडू पाटील व सहकारी यांनी कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांच्या यांच्याशी सदर 9850567386 क्रमांकावर संपर्क साधावा
पोलीस निरीक्षक संदीप पाटील(चाळीसगाव शहर)
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 20 सप्टेंबर 2023 रोजी एक 20 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार स्वप्नील युवराज चौधरी रा चाळीसगाव यांनी दिली होती. तक्रारीवरून गुन्ह्याचा तपास करत असताना तब्बल 18 लोकांची फसवणूक करणारे ठग चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात एकूण 30 लाख 54 हजार रुपयाची फसवणूक आरोपींनी केले असल्याचे समोर आले असून आजून कोणाची फसवणूक झाली असल्यास शहर पोलिसांना संपर्क साधण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे अवाहन.
याबाबत संपूर्ण वृत्त असे की टाकळी प्र चा येथे राहणारे संभाजी दगडू पाटील,अनिकेत संभाजी पाटील व आकाश संभाजी पाटील यांनी सीएनजी गॅस पंप मिळवून देण्यासाठी 20 लाख 20 हजार रुपये ऍडव्हान्स घेऊन फिर्यादी स्वप्निल युवराज चौधरी यांची फसवणूक केली होती या अनुषंगाने वारंवार सांगून देखील आरोपी सीएनजी एजन्सी मिळवून देईना यामुळे हा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्वप्निल चौधरी यांनी शहर पोलीस ठाणे गाठत आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता यावरून गुन्हाचे स्वरूप पाहत वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी, पोकॉ अमोल पाटील, प्रकाश पाटील, पवन पाटील, भरत गोराळकर, महिला पोलीस अमंलदार सबा शेख व विमल सानप या पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेत भादवी कलम 420,504,34 गुन्हा दाखल करत तपास करीत असताना पर्सनल लोन,पशुपालन कर्ज,शेळी पालन कर्ज व अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन देत अजून 18 लोकांची तब्बल 30 लाख 54 हजार रुपयाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून फसवणुकीतील रक्कम कोठे विल्हेवाट लावली याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी व पो कॉ अमोल पाटील करत आहे.