Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

लिफ्ट देण्याचे बहाण्याने लुटमार करणारी टोळी जेरबंद : २ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस : पुणे ग्रा. एलसीबी शाखेची कामागिरी

4 0
Read Time6 Minute, 17 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दि.५/१२/२०२० रोजी रात्री ०९.३० वा.चे सुमारास फिर्यादी संजय मिश्रीलाल मुनोत वय ५४ हे बार्शी येथून एसटीने कुरकुंभला उतरून दौंड येथे घरी जाणेसाठी थांबले असताना त्यांना एका मोटरसायकल वरील अनोळखी इसमाने दौंड येथे जाणेसाठी लिफ्ट देतो असे सांगुन त्याचे मोटरसायकल वर मागे बसवून भागवतवस्ती कॅनलपासुन कॅनलचे भरावावरुन फायर बटाकडे निर्जन स्थळी नेवुन तेथे मोटारसायकलवर थांबलेले त्याचे दोन जोडीदार यांचेजवळ नेवुन तिघांनी मिळून, ”फिर्यादीस दमदाटी करून सर्व काढुन दे. नाही तर भोकसुन टाकीन” अशी धमकी देवून त्याचे खिशातील रोख रक्कम रुपये १०,०००/- तसेच दोन अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन, घड्याळ व मोबाईल असा किंमत रुपये १,९४,०००/- चा ऐवज जबरीने हिसकावून चोरी करुन घेवुन गेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पो.स्टे. ला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB पथक कुरकुंभ परिसरात करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओमकार गावडे रा.बेटवाडी व त्याचे साथीदार हे चोरीचे मोबाईल व अंगठ्या विकणेसाठी कुरकुंभ एसटी स्टँड समोर आलेले आहेत. त्यानुसार LCB पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून तेथे संशयास्पद रित्या मिळून आलेले
१.ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे वय २१ वर्षे रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड जि.पुणे
२.राजेश संभाजी बिबे वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा.माळेवाडी ता.जि.बिड
३.अजय ज्ञानेश्वर पवार वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे
४.विशाल दिलीप आटोळे वय २४ वर्षे रा.गोपाळवाडी , गोकुळनगर ता.दौंड जि.पुणे
यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ पल्सर मोटरसायकल, २ सोन्याच्या अंगठ्या, ८ मोबाईल व रोख रक्कम असा किं.रु. २,२६,२७०/- चा माल हस्तगत केला. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपी क्र.१ ते ३ यांनी मिळून प्लान करुन एका व्यक्तीस लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटल्याचे व त्यांचेकडे मिळालेल्या दोन अंगठया त्याच चोरीतील व पल्सर मोटरसायकल गुन्हा करताना वापरल्याचे सांगितले आहे. गुन्हयातील चोरलेला मोबाईल हा आरोपी क.४ विशाल दिलीप आटोळे यास १०,०००/- रुपयाला विकल्याचे सांगितले. तो मोबाइलही त्याचेकडून हस्तगत केलेला आहे.
सदर आरोपी क्र.१ ते ३ यांचेकडे आणखीन चौकशी करता त्यांनी सुमारे २० दिवसापूर्वी पहाटे ०४.०० वा.चे सुमारास कुरकुंभ एमआयडीसी पुणे-सोलापूर हायवे लगतचे शिवरत्न लॉजचे समोर लावलेल्या आयशर टेम्पोची काच फोडून टेम्पोत झोपलेल्या ड्रायव्हरचे डोक्यात काठीने मारुन त्यास कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोचे डॅशबोड मधील २८००/- रुपये जबरीने चोरल्याचे सांगितले. सदर बाबत दौंड पो.स्टे. जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
*सदर आरोपींकडून दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील २ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले असून आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून कुरकुंभ व परिसरात लिफ्ट देऊन आणखीन कुणाला जबरदस्तीने लूटमार झाली असल्यास दौंड पोलीस स्टेशनला लवकरात लवकर संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केले असून जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे.

   सदरची कामगिरी मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,  बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी श्री.राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक पद्माकर घनवट,

सहा.पो.नि. पृथ्वीराज ताटे,
पो.हवा. महेश गायकवाड,
पो.हवा. निलेश कदम,
पो.हवा. सचिन गायकवाड,
पो.ना. गुरू गायकवाड,
पो.ना. सुभाष राऊत,
पो.कॉ. दगडू विरकर यांनी केलेली आहे.पुढील तपास पो.निरीक्षक श्री. नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप पो.निरीक्षक काटे मॅडम करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: