लॅपटॉप चोर अवघ्या 3 तासात पोलिसांच्या ताब्यात,शहर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – तालुक्यातील खडकी बु येथील औद्योगिक वसाहतीतील भारत वायर रोप मधील प्रशासकीय कार्यालयातून 1 लाख रुपये किंमतीचे 2 लॅपटॉप चोरणाऱ्या दोघा आरोपींना चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन चे डी बी चे पोलीस नाईक राहुल सोनवणे व महेंद्र पाटील यांनी तपास करून अवघ्या 3 तासातच अटक केली असून दोघा पोलिसांचे कौतुक होत आहे.दोन्ही आरोपींवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील खडकी बु येथील औद्योगिक वसाहतीतील भारत वायर रोप मधील प्रशासकीय कार्यालयातून 1 लाख रुपये किंमतीचे 2 लॅपटॉप दि 9 जून 23 रोजी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांच्या ते ते दि 10 जून 23 रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटं वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची फिर्याद कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक रणधीर परदेशी रा चाळीसगाव यांनी दि 10 रोजी रात्री 8 वाजता दिल्यावर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल होवून तपास पोलीस नाईक राहूल सोनवणे करीत होते.
चोरीचे लॅपटॉप दोघे जण विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती डी बी चे पोलीस नाईक राहुल सोनवणे, महेंद्र पाटील यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी दि 10 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास भारत वायर रोप कंपनी परिसरात संशयित रित्या फिरत असलेले राहुल संतोष कोल्हे वय 18, भूषण सुनील मुंगसे वय 19 दोघे रा खडकी बु ता चाळीसगाव यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी लॅपटॉप चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवघ्या 3 तासातच चोरीचा उलगडा करून आरोपीना ताब्यात घेणाऱ्या दोघा पोलिसांचे कौतुक होत आहे.