अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मुंबई-लॉकडाऊन लावायचा किव्वा नाही हे जनतेच्या हातात आहे असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले
काल रात्री प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की ज्यांना लॉकडाऊन नको त्यांनी शासन नियमांचे पालन करावे जसे मास्क घालणे,सोशल डिस्टन्सचे पालन करणे,बाहेरून आल्यावर हात धुणे अश्याया छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करावे ज्यांना लॉकडाऊन हवे आहे त्यांनी विना मास्क फिरावे,सोशल डिस्टन्सचे पालन न करणे अश्या चूका केल्या म्हणजे जनतेला नेमकं काय हवे हे कळेल आता निर्णय पूर्ण पणे जनतेच्या हाती आहे शासन नियमांचे पालन करून लॉकडाऊन लावायचे नाही की शासन नियम मोडून लॉकडाऊन लावायचे यासाठी 8 दिवसाचा वेळ आहे असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हटले व शासन नियमाचे पालन करण्याचे आव्हान देखील त्यांनी जनतेला केले आहे.