लोंढे येथे शेतीपंपाला 8 तास वीजपुरवठा मिळावा : मोहित भोसले

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-एकीकडे उन्हाची वाढती तीव्रता दुसरी कडे मुबलक पाणी असून देखील लोंढे येथे वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून शेतीपंपाला कमीत कमी 8 तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी आज दि 21 रोजी कार्यकारी अभियंता महावितरण चाळीसगाव यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहित भोसले यांनी निवेदन दिले आहे.
लोंढे गावाला शेतीपंपाला वीजपुरवठा सुरळीत होत नसून मागील दोन ते तीन दिवसांमध्ये 3 तासांच्या वर वीजपुरवठा मिळाला नाही व तो ही रात्री 9 ते 1 वाजेपर्यंत ,कालही 24 तासात फक्त 2 तास वीज मिळाली, पानी असून पीक जळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असून आता वेळोवेळी तक्रारी करूनसुद्धा जर 8 तास सुरळीत वीजपुरवठा मिळाला नाही, तर आम्हा शेतकऱ्यांची मनस्थिती अतिशय वाईट झालेली आहे,तरी लोंढे गावाला वीजपुरवठा सुरळीत करून कमीतकमी 8 तास वीज देण्यात यावी,असे न झाल्यास आम्हा शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन, रास्तारोको,उपोषण,यावरही न झाल्यास आत्मदहणाची वेळ येईल,असे निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदन अभियंता महावितरण चाळीसगाव यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहित भोसले यांनी दिले, यावेळी उपसरपंच जयसिंग भोसले,मा.जी.प.सदस्य रमेश निकम, सरपंच राहुल सोनवणे ,मा.सभापती हिरामण सोनावणे, वि.का.सो.चेअरमन अशोक पवार,व्हा. चेअरमन पितांबर पगारे,ग्रा.पं. सदस्य राजेंद्र पवार,ग्रा.पं.सदस्य सुरेश पगारे,विश्वजीत पवार,भानुदास भोसले, महेश भोसले, अरुण भोसले, अमोल भोसले, आबाजी साबळे,दत्तात्रेय पवार,किसन पगारे,गंगाराम केदार,साहेबराव निकम,दशरथ बच्छाव, सुभाष राणे,अनिल केदार,संजय चव्हाण,ज्ञानेश्वर निकम,नामदेव राणे,प्रभाकर पवार,नथु रावते,यांसह पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.