Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उद्यानाची तातडीने दुरुस्ती करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

0 0
Read Time2 Minute, 13 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उद्यानाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिला आहे .
आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या शहरातील एकमेव उद्यानाची दुरावस्था झालेली आहे .त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे .शहरातील गोरगरिबांच्या मुलांना खेळण्यासाठी कुठेही उद्यान उपलब्ध नाही .ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विरंगुळा केंद्र नाही .नगरपालिकेचे एकमेव असलेल्या उद्यानाची ही अतिशय वाईट अवस्था झालेली आहे .या उद्यानाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे .नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांना निवेदनाद्वारे ताबडतोब दुरुस्ती करण्याबाबत विनंती केली आहे .
अन्यथा महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानात 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता निषेध सभा घेण्यात येईल व त्यानंतर त्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल .कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असा इशाराही दौड नगरपालिकेला देण्यात आलेला आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: