अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव-दि 31 ऑगस्ट रोजी झालेल्या सकाळी अचानक नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यात कन्नड घाटात दरड कोसळल्याने ट्राफिक जाम झाली असून तात्काळ घाटात आपल्या टीम सोबत जाऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भागवत पाटील यांनी मदत कार्य सुरू केले असून घाटातून वाहन धारकांना प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे
त्याच प्रकारे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सदगीर साहेब यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश देत शहरातून कन्नड घाटाकडे जाणाऱ्या वाहन धारकांचे हाल होऊ म्हणून उपाय योजना करत शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट येथे बॅरिकेट लावत कन्नड घाटाकडे जाणाऱ्या वाहनांना नांदगाव कडून जाण्याचे आवाहन करत आहेत मुसळधार पावसात उभे राहून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आपल्या परिवाराची चिंता न करता जनतेच्या परिवारासाठी रस्त्यावर सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कितीही कौतुक केले तरी कमी आहे,संकटसमयी सदैव सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आपले कर्तव्य चोख पणे पार पडणाऱ्या पोलीस प्रशासनास सलाम असून आपल्या जबाबदारी सशक्तपणे पार पाडत लोकांची गैर सोय होणार नाही याची काळजी करणारे पोलीस प्रशासनाचे मनापासून धन्यवाद