संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – मराठा समाजाला सोशल मीडिया च्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने एकत्र करणाऱ्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष, मराठा समाजासाठी आरक्षणासाठी , मराठा तरुणांनासाठी अहोरात्र मेहनत करणारे , आपल्या परखड वक्तृत्व शैलीने मराठ्यांच्या मनावर राज्य करणारे कै. प्रविण पिसाळ सर,मराठा प्रविण
यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, त्यांच्या जाण्याने मराठा समाजात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे ,मराठा कै. प्रवीणजी पिसाळ यांच्या कार्याविषयी सुजित सोनवणे यांनी उजाळा दिला तद्दनंतर त्याना दि २१ रोजी दुपारी १२ वाजता रेष्ट हाऊस चाळीसगांव येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,मराठा सेवा संघ शहरअध्यक्ष प्रशांत गायकवाड,मराठा महासंघ शहर अध्यक्ष खुशाल बिडे, संभाजी सेनेचे अविनाश काकडे,मराठा गोविंदा चव्हाण,विशाल पाटील,पंकज बिडे ,चेतन गवळी,नामदेव पाटील,दिलीप पवार अदि उपस्थित होते