अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहर पो स्टे हद्दीत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पो नि मा विजयकुमार ठाकूरवाड व मा. तहसीलदार श्री अमोल मोरे सो, चाळीसगाव यांचे पथकाने आज दि 15 ऑक्टोबर 2020 गुरुवार रोजी चाळीसगाव धुळे रोडवरील अवैधरित्या बेकायदा वाळू या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर आज रोजी कारवाई केली असून, अंदाजे 35000/- रुपये किमतीची 7 ब्रास वाळू व अंदाजे 15,00,000/- रुपये किमतीचा एक ट्रक ताब्यात घेण्यात आला असून,
सदरबाबत ट्रक चालक व मालक यांचे विरोधात चाळीसगाव शहर तलाठी श्री. विनोद कृष्णराव मेन यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 276/2020 भादवी कलम 379, 109, 34 अन्वये गुन्हा नोंद करून, सदर गुन्ह्यात आरोपी चालक नामे रामचंद्र उर्फ सुनील मारुती डांगे, राहणार- निमगाव, तालुका- मालेगाव, जिल्हा- जळगाव यास आज रोजी अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मयुर भामरे करीत आहेत.