अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी) काल दिनांक 26 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे येथील कार्यकर्ते राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत भेटण्यास गेले असता त्यांनी भेट देण्यास नकार दिला. म्हणून परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केले. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
याच्या निषेधार्थ अभाविप चाळीसगाव तर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांचे विविध मागण्या पूर्ण करण्याची व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना अभाविप चाळीसगाव तालुका प्रमुख सारंग पाटील, शहरमंत्री शुभम जोशी, मनोज कापडणे, अभिषेक शेंडे, क्षुधांत पाटील, सागर पाटील, ऋत्विक पाठक, स्वप्निल वाघ, प्रवीण माळी, मयुर देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते
