अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा
चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 29 चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे मा पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस शिपाई विनोद खैरनार, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, संदीप पाटील, तसेच होमगार्ड जाधव, पवार, पाटील यांचे पथकाने चाळीसगाव नगरपालिकेचे कर्मचारी अजय देशमुख, किशोर राजपूत व रफिक शेख यांचे सोबतीने चाळीसगाव शहरातील गर्दीचे ठिकाण असलेल्या आर्योपार चौकात नाकाबंदीचे आयोजन करीत विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली, सदर कारवाईत 52 नागरिकांकडून प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे 5200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यावेळी, नागरिकांनी मास्क न लावल्याची बहुविध कारणे सादर करीत पळवाटा शोधन्याचा प्रयत्न केला. त्यात, आता घरातून बाहेर आलो, दवाखान्यात गेलो होतो, तब्बेत बरी नाही, अंत्यविधीला जात असल्याने विसरलो, पहिल्यांदाच मास्क घालायला विसरलो अशी कारणे दिली परंतु, पोलिसांनी त्यांना मास्क लावणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले व त्यांचा कडून नगरपालिका कर्मचााऱ्यांनी दंड वसूल केला.
नागरिकांनी मास्क लावणे नितांत गरजेचे असल्याने विनामास्क घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी केले आहे.