विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भीम गौरव पुरस्काराने सन्मान…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती व ई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
या दिनाचे औचित साधित समितीच्या वतीने विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना भीम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ही दौलत महाराष्ट्राची हा भीम गौरव गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास दौंडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मा. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, तुषार थोरात, सोहेल खान, रवींद्र कांबळे, सचिन बनसोडे, महेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भीम गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम साळवे, अनिल साळवे, आनंद बगाडे, विशाल माशाळकर, हर्ष आढाव, सचिन साळवे, दिलीप पगारे, स्वप्निल कांबळे, संजय आढाव, जालिंदर सोनवणे, अजय गुजर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
भीम गौरव पुरस्काराचे सन्मानार्थि : राजू गजधने ( योग विद्या), दत्तात्रय जानराव (पो. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क), डॉ. दत्तात्रय वाघमोडे ( वैद्यकीय), नवनाथ काकडे (युवा उद्योजक), बळीराम देसाई ( विधीज्ञ), गौतम कांबळे ( शैक्षणिक), जॉन फिलिप ( नाट्य व कला), रुपेश जंजिरे ( औद्योगिक), दीपक चौधरी ( सामाजिक), साक्षी झेंडे (क्रीडा), सुमित सोनवणे(पत्रकारिता).