शिवाजी महाराजांचे बॅनर विटंबन तसेच विविध गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक चाळीसगाव पोलिसांची दमदार कारवाई

Read Time4 Minute, 21 Second

(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क)

चाळीसगाव प्रतिनिधी

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा क्र 167/2020 कलम 307,354,324,295 ए सह इतर गुन्हयातील पाहिजे फरार आरोपी राजेंद्र चौधरी व त्याचे मुलास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडून अटक

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिनांक 05/05/2020 रोजी शहरातील देवकर मळा भागातील रात्री 23:15 वाजता झालेल्या भांडणाच्या कारणाने फिर्यादी श्रीमती पाटील यांचे दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहरातील नगरसेवक व त्याचे 5 कुटुंबीय अशा विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या बॅनरचा उपयोग मजुरांच्या मुतारीसाठी केला व महाराजांच्या फोटोची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्या तसेच याचा जाब विचारला असता आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलांना तलवारीने वार करीत मारहाण केली व फिर्यादीचे कपडे फाडून तिचा विनयभंग करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा क्र 167/2020 कलम 307,354,324,295 ए सह इतर अन्वये दिनांक 6 मे 2020 रोजी गुन्हा नोंद केला होता.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकामी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते, परंतू आरोपींचा काहीएक ठावठिकाणा लागत नव्हता.
तरी आज रोजी पोलीस अधीक्षक सो जळगाव, अपर पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी सो चाळीसगाव तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विजयकुमार ठाकूरवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष रोही, सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, सहायक फौजदार भोसले, पोलीस अंमलदार गणेश पाटील, अभिमन पाटील, नितीन पाटील, पोना संदीप पाटील,पंढरीनाथ पवार, भटु पाटील, संदीप पाटील, राहुल गुंजाळ, सतीश राजपूत, भूषण पाटील, दीपक पाटील, गोपाळ बेलदार, विनोद खैरनार या पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यरात्री चाळीसगाव शहरापासून 18 किमी दूर असलेल्या बहाळ गावाच्या शिवारात रोडपासून 3 किमी दूरवर असलेल्या मक्याच्या शेतात फरार आरोपी राजेंद्र रामदास चौधरी लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्याने, वरील स्टाफने त्यास सापळा रचून, चहुबाजूने घेराव घालत, तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून अटक केली आहे,
तसेच दुसरा पाहिजे फरार आरोपी राहुल राजेंद्र चौधरी याचा देखील चाळीसगाव शहर परिसरात शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास आज पहाटे नमूद गुन्ह्यात अटक केली आहे.

सदर आरोपीना आज रोजी मा न्यायालयात हजर केले असता, त्याना 2 दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्त्यांनी सुट्टी वाया न घालवता तयार केले मास्क केली गरजूंची मदत
Next post चाळीसगाव व्यवसिकांवर दंडात्मक कारवाई लोकांच्या आरोग्य चांगले व लोक सुरक्षित राहावे या हेतूने कारवाई
error: Content is protected !!
%d bloggers like this: