चाळीसगाव(प्रतिनिधी):-विश्र्वभूषण डॉ.बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण देशात , व जगात देखील मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते . सामाजिक व राजकीय संघटना नव्हेतर शासकीय पातळीवर या महापुरुषाची जयंती साजरी करण्यात येते .
परंतु या वर्षी देशातील कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व देशात हा जयंत्योत्सव शांततेच नव्हे तर फक्त घरात साजरा केला गेला.
पुन्हा एकवेळ देशातील अभेद्य एकजूट बघायला मिळाली .
याच परिस्थिती नुसार आम्ही देखील सर्व शहर व तालुक्यातील सर्व सुजाण नागरिकांना , संविधान व लोकशाही वर विश्वास असणाऱ्या सर्व समाज बांधवां सह ,बौध्द समाज व आंबेडकर प्रेमींना ही जयंती घरातच साजरी करण्याचे व रस्त्यावर गर्दी न करण्याचे आवाहन केले होते .
त्या आवाहनास प्रतिसाद देवून तालुका व शहर वासियांनी घरातच जयंती साजरी केली .
कोणीही रस्त्यावर आले नाही .गर्दी केली नाही .अशा प्रकारे एकजुटीचे भव्य प्रदर्शन केले .14 एप्रिल चा हा मंगलमय दिन शासनाचा आदेशनुसार लॉक डाऊन पाळून साजरा करण्यात आला .
त्याबद्दल आम्ही सर्व तालुका व शहर वासियांचे जाहीर आभार मानतो .
त्यासोबत…चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनने केलेल्या सहकार्याबद्दल व चोख व्यवस्था ठेवल्या बद्दल …त्यांचे ही आभार मानतो .
त्याच प्रमाणे या सर्व आवाहनास आपल्या वर्तमानपत्रात व सोशल मीडियात प्रसिद्धी देवून आम्हास सहकार्य केल्याबद्दल आमच्या पत्रकार बांधवांचे देखील आभार मानतो .
तसेच याकामी आम्हास ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिले ,त्यांचे देखील आभार मानतो .
पुनश्च….मनापासून सर्वांचे आभार
आपले….
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी जयंती उत्सव समिती चाळीसगाव