शहरातील सात मुख्य ठिकाणी गणपती विसर्जनासाठी शहर पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गणेश मुर्ती संकलन व्यवस्था.

संपादक गफ्फार मलिक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहराच्या हद्दीतील गणेश मंडळांना व खाजगी घरगुती गणपती विसर्जन साठी शहर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दि 28 सप्टेंबर रोजी शहरातील मुख्य 7 ठिकाणी विसर्जनासाठी गणेश मुर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.
चाळीसगाव शहर पोस्टे हद्दीतील सर्व गणेश भक्तांना व गणेश मंडळाना सुचित करण्यात येते की, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सार्वजनिक तसेच खाजगी व घरगुती गणपतींचे 28 सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. तरी या दिवशी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव शहरातील श्री गणेश मुतीचे ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या मदतीने संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी 1) वाणी मंगल कार्यालय भडगाव रोड, 2) रोहीत प्लाझा घाटरोड 3) राष्ट्रीय महाविद्यालय हिरापुर रोड, 4) स्टेट बँक ऑफ इंडिया भडगाव रोड. 5) वाय. पॉईन्ट धुळे रोड, 6) जुना मालेगाव रोड आशिष हॉटेल जवळ, 7) जिंतुरकर विहीर, हनुमानवाडी या सात ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने गणेश मुर्तीचे व निर्माल्याचे (पुजा साहीत्याचे) संकलन करण्यासाठी स्टॉल (मंडप ) लावण्यात येणार आहेत. त्याठिकाणी शहरातील नागरिक हे खाजगी तसेच घरगुती गणपती मुर्तीचे दान करु शकतील. त्यानंतर त्याठिकाणच्या मूर्तींचे देखील नगरपालीकेच्या वतीने योग्य ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. याची चाळीसगाव शहरातील सर्व गणेश मंडळ व गणेश भक्त यांनी नोंद घ्यावी असे अवाहन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सर्व गणेश भक्तांना केले आहे.