संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-पोलिस कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे वाट चुकलेल्या तरुण महिलेला सुखरूपपणे तिच्या नातेवाईकांकडे रवाना केल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले. तक्रार नसतानाही पोलिसांनी यात लक्ष घातल्याने ही महिला सुखरूप घरी पोहोचली आहे.
दिनांक 12 जुलै 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास मालेगाव रोड परिसरात एक महिला ही रस्त्यावर फिरत असताना तिच्या नाव पत्त्याची खात्री करून तिने तिचे नाव अर्चना बापू रामोशी रा. जवखेडे तालुका एरंडोल असे सांगितल्याने व ती वेडसर सारखे वर्तन करत असल्याने चाळीसगाव येथील मालेगाव रोड परिसरातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने चाळीसगाव तालुक्यातील तिचे नातेवाईक शोभा भीमराव मोरे रा. देवळी तालुका चाळीसगाव हिच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.सदर प्रकरणाची गांभीर्य पाहून सतर्कता घेऊन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक राहुल सोनवणे,पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील,रवींद्र बच्चे यांनी ही कामगिरी केलेली आहे.या कामगिरी मुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.