अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दिनांक 26 नोहेंबर 2008 रोजी मुंबई येथे आंतकवादी संघटनेकडुन आंतकवादी हल्ला करण्यात
आला होता त्यात आंतकवाद्यांशी मुकाबला करतांना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते.
तसेच अनेक निष्पाप लोकांना आपला जिव गमवावा लागला होता. त्या सर्वांच्या स्मरणार्थ मा.डॉ.प्रविण मुंडे पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतुन तसेच मा.श्री.रमेश चोपडे,अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परिमंडळ व मा.श्री.कैलास गावडे उप विभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या दि.26 नोहेंबर 2021 शुक्रवार रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे चाळीसगाव शहर पोलीसांच्या व सत्यम रक्तदाता ग्रुप चाळीसगाव यांच्या वतीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारात सकाळी 09.00 वाजे पासुन भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे,
चाळीसगांव शहरातील तसेच संपुर्ण तालुक्यातील नवयुवक यांना आव्हान करतो की, आपण या दिवशी जास्तीत-जास्त संख्येने रक्तदान करण्यासाठी उपस्थितीत रहावे. व मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शहीद झालेले सर्व सामान्य नागरिक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी व त्यांचे आपण या निमीत्ताने जे स्मरण करणार आहोत हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल. तरी आपण सर्व चाळीसगाव प्रेमी /नवयुवक यांनी रक्तदान करण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने हजर रहावे ही आपणास सर्वांना आग्रहाची विनंती के के पाटील पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पो.स्टे. यांनी केली आहे