शासकीय कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन न्यू महाराष्ट्र पॅंथर सेनेच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 9 डिसेंबर रोजी न्यू महाराष्ट्र पॅंथर सेनेच्या वतीने शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन देश भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मिटवूया,भारताला समृद्ध बनवूया…!
अंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस ९ डिसेंबर
देशाच्या विकासामध्ये भ्रष्टाचार अडथळा ठरत आहे म्हणून भ्रष्टाचार संपविणे ही प्रत्येक देशासाठी काळाची गरज आहे. म्हणून ९ डिसेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
भ्रष्टाचाराच्या निर्मुलनासाठी जागृकता निर्माण करणे हा या दिनाचा उद्देश आहे.
“भ्रष्टाचार विरोधी एकत्र येऊया भ्रष्टाचार मिटवुया”
“भ्रष्टाचार मिटवुया देश पुढे नेऊया. “
“लाच देऊ नका, लाच घेऊ नका. भ्रष्टाचाराला खतपाणी घालु नका.
देशातील सर्व कार्यालये व जनता मिळून आपण आज आपण अंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्ताने प्रतिज्ञा करूया आजपासून ना लाच देणार, ना लाच घेणार माझा देश भ्रष्टाचार मुक्त करणार.दौंड तहसील कार्यालय दौंड पोलीस स्टेशन दौंड नगरपालिका व पंचायत समिती या कार्यालयाला भेट देण्यात आली अशी माहिती जयदीप माणिक बगाडे राष्ट्रीय अध्यक्ष न्यु महाराष्ट्र पँथर सेन यांनी दिली. यावेळी जयदीप बगाडे, भारत सरोदे, पांडुरंग गडेकर,बी, वाय, जगताप, सुधीर वाघमारे, प्रकाश सोनवणे, रोहित पाडळे, श्रीनाथ ननवरे ,पांडुरंग गायकवाड, चंद्रकांत लोंढे हे उपस्थित होते