शिवा व्हॅली स्कूल मार्फत, विद्यार्थ्यांसाठी “हितगुज पत्रकारांशी” या खुल्या चर्चा सत्राचे आयोजन……..

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-,दिनांक २४ एप्रिल २०२३,देऊळगाव गाडा,ता-दौंड,जि-पुणे,येथील शिवा व्हॅली शाळा,प्राचार्य- किरण सिंग,शाळेचे सर्व शिक्षक वर्ग,याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता या विषयासाठी खुल्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चा सत्रामध्ये पत्रकारिता म्हणजे काय? पत्रकारितेचे प्रकार, प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीया यातील फरक कोणता? पत्रकारिता करत असताना येणाऱ्या समस्या,अडचणी,यावर कोणते मार्ग काढले जातात.या सर्व बाबतीत चर्चा करण्यात आली.या चर्चेनंतर विद्यार्थ्यांमधून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर विद्यार्थ्याना समजतील अशा प्रकारे उपस्थित सर्व पत्रकार मित्रांकडून प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
यावेळी उपस्थित शाळेच्या प्राचार्य-किरण सिंग मॅडम,क्रिडा शिक्षक- प्रविण होले,सर्व शिक्षक वर्ग,रमेशजी वत्रे-दै. सळाळ,विजयजी चव्हाण-दै. पुढारी,विठ्ठल होले-पोलीस टाईम्स,योगिताजी रसाळ-अधिकार आमचा,बापूसाहेब नवले-दै.पुण्यनगरी,एम.जी.शेलार-नवमहाराष्ट्र,नवनाथजी खोपडे-महाराष्ट्र,आनंदा बारवकर- मुख्य संपादक नवमहाराष्ट्र भूमी,सुमित सोनवणे आय.बी.एन.लोकमत,नवनाथजी खोपडे- महाराष्ट्र भूमी केडगाव,मा.विठ्ठल शिपलकर,दिवेकर-महाराष्ट्र भूमी वरवंड,श्रीकांत गायकवाड-कॅमेरा मॅन अधिकार आमचा इत्यादी पत्रकार बंधू आणि मान्यवर उपस्थित होते.