शिव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला नागरपालिकेतर्फे आकर्षक रोषणाई करावी-रयत सेना

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी जयंती निमित्त शहरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला आकर्षक रोषणाई करून पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेनची व्यवस्था नगरपालिका ने करावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी असल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरात चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने आकर्षक रोषणाई करून चाळीसगाव शहराचा मध्यवर्ती ठिकाण असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा परीसर शहर वासीयांचे लक्ष वेधून घेणार आहे.तसेच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्याची मागणी चाळीसगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी उमेश ठोंबरे यांना रयत सेनेच्या वतीने दि २३ रोजी करण्यात आली आहे.
रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,सांस्कृतिक सेनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन पवार, भ्रष्टाचार निर्मूलनचे प्रदेश अध्यक्ष खुशाल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे,शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड ,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,तालुका उपाध्यक्ष भरत नवले, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक दीपक देशमुख,शाखा अध्यक्ष मनोज चव्हाण, राजेंद्र पाटील,सागर चव्हाण ,अनिकेत पगारे,महेश आगोणे यांच्यासह रयत सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.