
शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम मिळावी यासाठी दि.20/11/2019 रोजी जारगाव चौफुली वर रास्ता रोको आंदोलन करणे बाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन .
पाचोरा भडगाव तालुक्यातील शंभर टक्के शेतकरी या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी च्या पावसामुळे बाधित झाले असून त्यांच्या शेतातील पिकांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे. याबाबत शासनाचे आदेशाने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले असून तसा अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. विद्यमान परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती शासन असल्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्याची संपूर्ण अधिकारी माननीय राज्यपाल साहेब यांना आहेत वरील परिस्थिती असताना शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसानीची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी अस्वस्थ असून त्याची मनस्थिती आत्महत्या कडे चुकत आहे,माननीय राज्यपाल महोदयांनी 8000रु मदत देऊ केली आहे,ती अत्यंत तुटपुंजी असून माननीय राज्यपाल साहेब यांनी शेतकऱ्यांना तातडीने सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत जमा करावी या मागणीसाठी आम्ही शिवसेना व युवासेना तर्फे दिनांक 20.11. 2019 बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता जारगाव चौफुली पाचोरा येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत,तरी याबाबत आपण नोंद घ्यावी शेतकऱ्यां चे प्रतिनिधी म्हणून आमच्या भावना माननीय राज्यपाल साहेब यांच्या पर्यंत पोहोचवाव्यात यासाठी उपविभागीय अधिकारी साहेब पाचोरा यांच्याकडे निवेदन देण्यात आले,यावेळी शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, नगरसेवक बापू हटकर ,विशाल राजपूत, जितू पेंढारकर ,गणेश चौधरी ,संतोष हटकर ,वैभव राजपूत ,दीपक पाटील ,नितीन पाटील, रवींद्र हटकर, हेमराज पाटील, विठ्ठल शिरसाठ, विनोद पाटील, राहुल पाटील, वाल्मिक जाधव, निलेश मराठे, अतुल मराठे, अनिकेत सूर्यवंशी, प्रदीप पाटील, खंडू सोनवणे, विजय पाटील, सुनील महाजन, हरिभाऊ पाटील, मतीन बागवान हे उपस्थित होते.
Related
More Stories
राज्य परिवहन चाळीसगाव आगारात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे...
संविधान घराघरात पोहचविण्यासाठी संविधान जागर अभियानाचे आयोजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने...
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 22 युट्युब वृत्तवाहिन्या,3 ट्विटर खाते,1 फेसबुक खाते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले ब्लॉक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दिल्ली(वृत्तसेवा)-माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022...
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास सभासदांचा विरोध….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीच्या दि.6 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत केवळ सर्वसाधारण...
घराणेशाहीचा पराभव जनतेचा विजय-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क https://twitter.com/narendramodi/status/1501960490402127874?t=keQ46I9RKA_jQ8k8qYC_Lw&s=19 दिल्ली(वृत्तसेवा)-दि 10 मार्च रोजी दिल्ली भाजपाच्या मुख्य कार्यालयावर भाजपातर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात...
आमचा दिवस कोणता?………… पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे
अधिकार आमचा दिनविशेष लेख पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे महिला दिन भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व...
Average Rating