समग्र शिक्षाची महाराष्ट्र बँकेतील खाती बंद करू नयेत-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

0 0
Read Time3 Minute, 34 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र बँकेतील समग्र शिक्षा अभियानाची खाती बंद करण्यात येऊ नये ती चालू ठेवावीत अशी मागणी राज्य प्रकल्प संचालक सर्व शिक्षा अभियान यांच्याकडे केली आहे . या विषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, म. प्रा. शि. मुंबई कार्यालयाने समग्र शिक्षा अभियानाकरिता SNA Account म्हणून HDFC Bank यांची निवड प्रक्रिया प्रस्तावित केलेली आहे .त्या अनुषंगाने जिल्हास्तर, मनपास्तर / SCERT पुणे / तालुकास्तर / शाळा स्तर / डायट / KGBV या सर्व Imalimenting Agency मधील समग्र शिक्षा करिता विविध स्तरावर HDFC Bank यांचे अकाउंट उघडण्यास आदेशित केले आहे.परंतु काही महीन्यांपूर्वीच समग्र शिक्षाचे शालेय बॅंक खाते BANK OF MAHARASHTRA या बँकेच्या शाखांमध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांनी वारंवार प्रयत्न करून उघडले आहे.आणि पुन्हा नविन खाते HDFC बॅंकेत उघडणेबाबत वरील संदर्भीय पत्रामुळे शिक्षक बांधवांमध्ये द्वीधा अवस्था निर्माण झाली आहेया बँकेत पाच हजार रुपये डिपॉझिट ठेवणे बंधनकारक आहे.तर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झिरो बॅलन्स वर समग्र शिक्षा ची खाती उघडण्यात आली आहेत .एवढी मोठी रक्कम मुख्याध्यापक एचडीएफसी बँकेत गुंतवू शकत नाहीत . तसेच वारंवार आदेश बदलून आणि बॅंक खाते उघडण्यासाठी वारंवार सूचना देऊन त विद्यार्थी अध्यापनाचा अमूल्य वेळ वाया घालवण्यात येत आहे . यासाठी मुख्याध्यापक तयार नाहीत. त्यामुळे सध्या BANK OF MAHARASHTRA मधील समग्र शिक्षा बॅंक खाते समग्र शिक्षा अनुदानासाठी वापरण्यात यावीत. .उघडलेली खाती कायम ठेवावी अशी मागणी समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .यावेळी राज्य महासचिव,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण व महासचिव मिलिंद देटगे , भोर तालुकाध्यक्ष अमोल लोंढे ,वेल्हा तालुकाध्यक्ष बाळासाहेब खरात ,मुळशी तालुकाध्यक्ष दशरथ गावडे, जिल्हा शिक्षक नेते कुंडलिक कांबळे,हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.