सोलापूर हायवेला रोड रॉबरी चा धुमाकूळ घालणारी टोळी दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक ने केली जेरबंद

2 0
Read Time2 Minute, 57 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-सोलापूर हायवेवर इंदापूर,भिगवण, दौंड, यवत, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत या हद्दीत रस्त्यावरून मोटरसायकलवरून येना जाणाऱ्या लोकांना कोयत्याने वार करून तसेच धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीला दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून बेड्या ठोकल्या यात आरोपी नामे सागर संदिपान शिंदे राहणार बिबेवाडी पुणे यास अटक करून त्याच्यासोबत रोड रॉबरी करणारे सराईत गुन्हेगार 1) शिवराज बाबासाहेब कोकरे राहणार बिबेवाडी पुणे 2) आकाश उद्धव कोपनर राहणार गोकुळ नगर लेन नंबर 6 पुणे 3) योगेश उर्फ पप्पू देवराव गोयकर राहणार कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या आरोपींची नावे निष्पन्न केली आहे. यातील काही आरोपी नुकतेच येरवडा कारागृहातून जामिनावर सुटलेले होते. सदर टोळीने हायवेवर रोड रॉबरी चा धुमाकूळ घातला होता.
परंतु दौंड पोलीस स्टेशन पथकाने गोपनीय बातमीदारांना तसेच सीसीटीव्ही फुटेज याच्या मदतीने आरोपी पुणे येथे जाऊन बिबेवाडी झोपडपट्टी येथून अत्यंत शिताफीने पाठलाग करून अटक केला. अटक आरोपी कडून पुणे सोलापूर हायवे वर वेगवेगळ्या ठिकाणी अजून रॉबरी केल्याचे उघड केले आहे. त्यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनच्या एक तसेच भिगवण पोलिस स्टेशनची एक जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड श्री राहुल धस, पोलीस निरीक्षक दौंड श्री नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
पीएसआय विजय वाघमारे पोलीस हवालदार रोटे, हुलगुंडे पोलीस कॉन्स्टेबल विशाल जावळे, किरण चंदनशिवे, आदेश राऊत यांनी केली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.