स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला जि. प. शाळेत रयत सेनेच्या वतीने स्वच्छता अभियान

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मेहुणबारे(प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील जि प शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसध्येंला मेहुणबारे रयत सेना शाखेच्या वतीने दि १४ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रयत सेनेने शाळा परीसरात स्वच्छता अभियान राबविल्याने शाळेच्या मुख्याध्यापकानी रयत सेनेचे कौतुक केले.
मेहुणबारे जिल्हा परीषद शाळेत रयत सेनेच्या वतीने वही वाटपाचा कार्यक्रमाप्रसंगी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड साहेबांनी मेहुणबारे जि प शाळा व परीसरात स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे असल्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मेहुणबारे रयत सेना शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि प शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसध्येंला मेहुणबारे रयत सेना शाखेच्या वतीने दि १४ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.रयत सेनेने शाळा परीसरात स्वच्छता अभियान राबविल्याने शाळेचे मुख्याध्यापक अजित पाटील व सहा. पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड साहेबांनी रयत सेनेचे कौतुक केले आहे. स्वच्छता अभियानात मेहुणबारे रयत सेना शाखेचे अध्यक्ष भगवान गजरे,उपाध्यक्ष संजय वाघ,संघटक प्रताप गजरे,कार्याध्यक्ष गंगाराम जाट,सहकार्याध्यक्ष आबा महाजन,सचिव विलास गजरे,व सोमा पवार,रितेश गजरे,रोहित भोई यांच्यासह रयत सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.