चाळीसगाव शहरातील हिरकणी महिला मंडळाकडून स्व.सतिष चंद्रसिंग पाटील (गुड्डू आबा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील बापजी जीवनदिप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि रुग्णांच्या एका नातेवाईकांसाठी मोफत अन्नछत्र आजपासून सुरु करण्यात आले. याप्रसंगी बापजी हॉस्पिटलमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ.स्मिता बच्छाव, डॉ.संदीप देशमुख, सौ.कोकिळा राजपूत, नगसेवक दीपक पाटील, उत्तमराव पाटील, श्री.सुबोध वाघ, बन्सीशेठ मेहता, अनिताताई शर्मा, सौ.मीना चौधरी हे लाभलेत, याप्रसंगी धन्वंतरीपूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली, याप्रसंगी श्रीकांत राजपूत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन केले. तर नगरसेविका सविता राजपूत, डॉ.संदीप देशमुख आणि सौ.स्मिता बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केलं, अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता बच्छाव म्हणाल्या की हिरकणी महिला मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलाय, अतिशय पुण्याचे अन्नदानाचे काम त्यांनी सुरु केल्याबद्दल मी अध्यक्ष सौ सुचित्रा ताई राजपूत यांचे आभार व्यक्त करते आणि ह्या कामात मी सदैव त्यांच्या सोबत आहे. तर डॉ.संदीप देशमुख यांनी देखील हिरकणी मंडळाचे आभार मानले, आभार व्यक्त करतांना हिरकणी मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा राजपूत म्हणाल्या की, माझ्या वडिलांकडून मला सामाजिक कामाचा वारसा मिळाला आहे मी गुड्डू आबा आणि तात्यांच्या स्मरणार्थ काहीतरी चांगलं आणि पुण्याचे काम करू शकले याचा मला आनंद आहे तसेच ह्या अन्नदानाच्या कार्यात जर कोणाला सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी संपर्क करावा ह्या आवाहना नंतर राहुल राजपूत यांनी दरमहा ५०० रु देणगी अन्नछत्राला चालू केली, तर बऱ्याच जणांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर मदत चालू केली आहे, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्ष सौ.सुचित्रा पाटील, प्रीती रघुवंशी, सौ.वैशाली काकडे, सौ.सुनंदा राजपूत, राहुल राजपूत, कविता अमृतकार,सुरेखा राजपूत, आस्वाद महाशब्दे, प्रताप भोसले, टोनु राजपूत, दीपक अमृतकार, बाबा दीक्षित, विठ्ठल राजपूत, मिलिंद राजपूत, पप्पू राजपूत, दीपक पाटील, अमित गुप्ता, गीतेश कोटस्थाने, संजय चौधरी, अनिल वराडे, दिलीप जाणे, पंकज सुराणा आणि पत्रकार मुराद पटेल यांचे सहकार्य लाभले तर अन्नछत्राला नागरिकांनी मदत करावी असं जाहीर आवाहन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आले आणि ज्यांना मदत करायची असेल त्यांनी हिरकणी महिला मंडळाला संपर्क साधावा.
Read Time3 Minute, 57 Second