हात नसलेल्या बहिणीचे प्रेम,पायाने बांधते राखी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
सोलापूर-रक्षा बंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे अतूट बंधन या बांधनास जन्मतः दोन्ही हात नसलेली बहीण कोणतीही खंत न करता दरवर्षी आपल्या भावनां आपल्या पायाने राखी बांधत असते
सोलापूर शहरातील दोन्ही हातांनी जन्मतः अपंग असलेली लक्ष्मी शिंदे यांना हात जरी नसले तरी पायांनी सर्व काम व्यवस्थित रित्या चातुर्याने पूर्ण करत असतात हात नसल्याची कधी खंत केली नाही चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा तेज बोलण्यातून प्रभाव मोठ्या स्वप्नांनी आपले विश्व तयार करणारी आपल्या कर्तृत्वाने अपंगत्वावर मात करणारी लक्ष्मी दर वर्षी आपल्या भावांसोबत रक्षा बंधन मोठ्या उत्साहात साजरा करते हाताने राखी बांधता येत नाही म्हणून आपल्या पायाने राखी बांधत पवित्र बंधनाचा सण साजरा करते सलाम आहे या ताईला कार्य कोणतेही असो करण्यासाठी मनाची तयारी हवी नाही तर न करण्यासाठी कारणे हजार आहेत.