२६ लाख ८६ हजार ३६८ रुपये किंमतीचा तबांखुजन्य गुटखा पान मसाला जप्त सहाय्यक पोलीस अधिक्षक, श्री. अभयसिंह देशमुख पथकाची कारवाई

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
एकुण- २६ लाख ८६ हजार ३६८/- रुपये किंमतीचा मिळून आलेले तंबाखूजन्य गुटखा पान मसाला
१)१८,६७,००८/- रुपये किमतीचे विमल पान मसाला चे ४८ पोते त्यात एका पोत्यात २०८ पाकिट व पाकिटात २२ पाऊच प्रत्येक पाऊच ची किंमत ८.५ रुपये
२) १९००/- रुपये किमतीचे V- १ TOBACCO नावाची तंबाखु च्या ९ गोण्या एका गोणीत ४५० पाकीट व
एका पाकीटात ११ पाऊच व एका पाऊच ची किंमत २ रुपये
३) ४९९२०० /- रुपये किंमतीचे राज निवास सुगंधित पान मसाला चे १३ पोते प्रत्येक पोत्यात २०० पाकीटे व एका पाकीटात ४८ पाऊच एका पाऊच ची किंमत ४ रुपये
४) २५४१००/- रुपये किंमतीचे V १ TOBACCO नावाची तंबाखु च्या ७ गोण्या एका गोणीत १६५० पाकीट व एका पाकीटात २२ पाऊच व एका पाऊच ची किंमत १५ रुपये
५) ५६१६० /- रुपये किंमतीचे सागर पान मसाला चे २ पोते प्रत्येक पोत्यात १३० पाकीट व एका पाकीटात १२ पाऊच व एका पाऊच ची किंमत १८ रुपये
पाचोरा(प्रतिनिधी)-तालुक्यातील तारखेडे ता. पाचोरा या गावी एका गोडावून मध्ये शासनाने प्रतिबंध केलेला तबांखुजन्य गुटखा पान मसाला व तत्सम पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचे उद्देशाने साठा करून ठेवलेला होता रात्री ८ वाजेच्या सुमारास चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, श्री. अभयसिंह देशमुख व सहकाऱ्यांनी धाड टाकत आरोपीसह एकूण २६ लाख ८६ हजार ३६८ रुपये किंमतीचा माल घेतला ताब्यात.
चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, अभयसिंह देशमुख यांना त्यांचे गोपणीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, तारखेडे ता. पाचोरा गावी एका गोडावून मध्ये काही इसमांनी शासनाने प्रतिबंध केलेला तबांखुजन्य गुटखा पान मसाला व तत्सम पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचे उद्देशाने साठा करून ठेवलेला आहे. सदर ठिकाणी जावून खात्री करून कायदेशीर कार्यवाही करणेकामी दोन पंच व सोबत पोकॉ अजय अशोक पाटील नेम-चाळीसगाव शहर पो.स्टे. तसेच पोना महेश अरविंद बागुल, पोकॉ राजेंद्र निकम अशांसह शासकीय वाहनामधुन चाळीसगाव येथून निघून पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावाचे शिवारातील एका पत्र्याचे गोडावून जवळ दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजता अचानक छापा टाकुन खात्री केली असता तेथे अनिल काशिनाथ वाणी रा. तरखेडे ता. पाचोरा हा मिळुन आला त्याने सदरचा माल हा दिलीप एकनाथ वाणी व गोकुळ एकनाथ वाणी दो.रा. तारखेडा ता. पाचोरा ह्याचे असल्याचे कळविले त्यांचे कब्जामध्ये बेकायदेशिररित्या खालील वर्णनाचा व किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी जिवीतास धोकेदायक होईल अशा प्रकारचा पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थ गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आला मिळुन आलेल्या मालासंदर्भात पाचोरा पोलीस स्टेशनला भाग-५ गुरनं. ३८/२०२३ भादवि कलम ३२८, २७२,१८८, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीएसआय योगेश गणगे हे करीत आहेत. सदरची कार्यवाही हि मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. एम राजकुमार साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक,चाळीसगाव श्री. रमेश चोपडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, श्री. अभयसिंह देशमुख यांनी व सहकाऱ्यांनी केलेली आहे. यापुढे देखील अशा प्रकारची अवैध धंद्याविरूध्द धडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा मानस श्री. अभयसिंह देशमुख साहेब यांनी व्यक्त केला आहे.
सदर कायदेशीर कार्यवाहीकामी पोचारा पोलीस स्टेशनचे पो.उप निरीक्षक, जितेंद्र थल्टे, पो.उप निरीक्षक, योगेश गणगे, सह फौ प्रकाश संतोष पोटील, पोना नरेंद्र नरवाडे, यांनी मदत केली आहे.