चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि.२१ फेब्रुवारी २०२३ रोजी चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा जंगल गस्ती करत असताना नियतक्षेत्र बोढरा मधील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये दोन संशयात्मक इसम आढळून आले. वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा यांनी संबंधित इसमाला अटकाव करून चौकशी केली असता त्याच्याकडील एका नायलॉन पिशवीत ताज्या तुटीचे चंदन गाभा लाकूड ५ किलो १५० ग्रॅम. एक विना दांडा लोखंडी कु-हाड, एक लाहन लोखंडी करवत तसेच दोन आयटेल कंपनीचे साधे मोबाईल मिळून आले. याबाबत वनकर्मचा-यांनी अधिकची चौकशी केली असता बोढरा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये सदर इसमांनी चंदनाची झाडे तोडून त्यापासून सुगंधित चंदन लाकूड गाभा करवत व कु-हाडच्या सहाय्याने तयार करुन एका नायलॉनच्या पिशवीमध्ये जमा केल्याचे आढळून आल्याने सदरचा मुद्देमाल वनपाल, बोढरा यांनी जप्त करुन भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६ (१) ड, इ, फ, ४१ (२) व तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ चे कलम २७, २९ भा.द.वि. कलम ३७८, ३७९ अन्वये वनरक्षक, बोढरा यांनी आरोपी सलमान खाँ. अबरार खाँ. पठाण, वय ३२ व शाबीर खॉ. अजमेर खॉ. पठाण, वय २४ दोन्ही रा. कुंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद यांच्या विरुध्द वनगुन्हा दाखल केला होता. दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी मे. न्यायदंडाधिकारी वर्ग -१ चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यांनी सदर आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी दिली. सदर कार्यवाहीत श्री डि.के. जाधव वनपाल, श्री अजय महिरे वनरक्षक बोढरा,श्री अमित पाटील वनरक्षक जुनोने, श्री रहीम तडवी वनरक्षक पाटणा, श्री प्रसाद कुलकर्णी वनरक्षक ओढरा, श्री अशोक मोरे विशेष वनरक्षक, श्री उमेश सोनवणे वनरक्षक, श्री बापू अगोणे, श्री लालचंद चव्हाण, श्री पृथ्वीराज चव्हाण, संरक्षण मजूर यांचा समावेश होता.
सदरची कार्यवाही मोहन नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), औरंगाबाद, श्रीमती आशा चव्हाण, सहा. वनसंरक्षक (वन्यजीव) कन्नड, श्री ज्ञानेश्वर देसाई वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास श्री डि.के. जाधव वनपाल बोढरा हे करीत आहे.
Read Time3 Minute, 12 Second