२ लाख ६९ हजार चे मुद्देमालासह २६ जुगारींवर सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख व पथकाची कारवाई

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील मेहुनबारे गावात सुरू होता ५२ पत्त्यांचा झना मन्ना नावाचा जुगार गुप्तमाहितीवरून रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, श्री. अभयसिंह देशमुख यांनी पथकासह छापा टाकत २ लाख ६९ हजार चे मुद्देमालासह २६ जुगारींना घेतले ताब्यात.
याबाबत संपूर्ण वृत्त असे की सहाय्यक पोलीस अधिक्षक, अभयसिंह देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, मेहुणबारे गावी भऊर गावाकडे जाणाऱ्या रोडलगत गढरी मळा येथे बंद घरात काही इसम हे स्वतःच्या फायद्यासाठी ५२ पत्त्याचे कॅटवर झन्ना मन्ना नावाचे मांगपत्ता नावाचे जुगाराचा खेळ खेळीत व खेळवीत आहेत. तरी त्या ठिकाणी जावुन कायदेशीर कार्यवाही करणेकामी दोन पंच व सोबत पोकॉ विश्वानाथ देवरे, पोकॉ अमृत पाटील, पोना महेश अरविंद बागुल, पोना राजेंद्र निकम, पोउपनि प्रकाश चव्हाणके, पोना कुशल शिंपी व पोना प्रकाश कोळी अशांसह शासकीय वाहना मधुन चाळीसगाव येथुन निघुन वर नमुद ठिकाणी जावून बातमीची खात्री झाल्याने दिनांक ०१ जून २०२३ रोजी रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी अचानक छापा टाकला असता तेथे २६ इसम जुगार खेळतांना मिळुन आले असुन त्याच्या जवळ ६१ हजार रु. रोख, २ लाख ८ हजार रुपये च्या ८ मोटार सायकली व पत्ता जुगाराचे साहीत्य असे एकुण २ लाख ६९ हजार चे मुद्देमालासह मिळुन आले असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनास्थळाचा पंचनामा पोउपनि प्रकाश चव्हाणके यांनी केला असून सदर आरोपीचे विरूध्द पोकॉ विश्वानाथ देवरे यांनी फिर्याद दिल्यावरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला मुंबई जुगार अॅक्ट कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. एम. रामकुमार साहेब, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव श्री. रमेश चोपडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, श्री. अभयसिंह देशमुख यांनी व त्यांचे पथकाने केलेली आहे. यापुढे देखील अशा प्रकारची अवैध धंद्याविरूध्द धडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा मानस श्री. अभयसिंह देशमुख यांनी व्यक्त केला आहे.