संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-हौशी सायकलवीर ॲड. आशा लक्ष्मण शिरसाठ पाटील यांनी सायकलवरून पंढरपूर साडे तीनशे किलोमिटरचे अंतर पार करीत पंढरपूर गाठत विठुरायाचे दर्शन घेतले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल असोसिएशन आयोजित छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर सायकल वारीत त्या सहभागी झाल्या होत्या शनिवारी सकाळी सहा वाजता वारीला सुरुवात केली आणि सोमवारी त्यांनी पंढरी गाठली.
अशा शिरसाठ पाटील या अनेक सामाजिक उपक्रमात ही सहभागी होत असतात. सध्या त्या रोज १५ ते २० किमी सायकल फेरी करीत असतात. छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल असोसिएशन हे गेल्या चार वर्षापासून पंढरपूर वारीचे नियोजन करीत आहे. ॲड. आशा शिरसाठ या प्रथमच या वारीत सहभागी झाल्या त्यांनी सायकलवरून साडेतीनशे किमी चे अंतर दोन दिवसात पार केले.
पंढरपुरात राज्यभरातून अलेल्या हजारो हौशी सायकल वीरांचा रिंगण सोहळा झाला, त्यात देखिल त्या सहभागी झाल्या होत्या. सायकल वरून पंढरपूर वारी करणे हा एक सुखद अनुभव होता. वारी मार्गावर पर्यावरणासोबतच वृक्ष लागवडीचाही संदेश आम्ही दिला अशी प्रतिक्रिया सायकल वारी पूर्ण केल्यावर दिली. सायकलींग करने हा आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट व्यायाम असल्याचेही त्यांनी सांगितले.संभाजी सेनेसह सहयाद्री प्रतिष्ठानने देखील त्यांच्या सायकल वारीचे कौतुक केले.