Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

विनापरवाना वाळू उपसा सुरूच,दौंड शहरात वाळू माफियांवर पुन्हा कारवाई-परि पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ टीम चा दणका

0
1 1
Read Time3 Minute, 39 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 28.3.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ तसेच पोलीस अंमलदार विशाल जावळे, किरण डूके, गणेश कडाळे, सागर गायकवाड, योगेश कर्चे असे हजर असताना पोलीस उप अधीक्षक श्री मयुर भुजबळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे राजेगाव गावचे हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तालुका दौंड जिल्हा पुणे येथे इसम नामे विष्णू उर्फ लाला बलभीम अमनर राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे हा पुणे जिल्ह्यातून तडीपार असतानाही त्याने सदर तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून पुणे जिल्ह्यात प्रवेश करून व तेजस मोरे राहणार खेड तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर तसेच अंकुश ठोंबरे राहणार गणेश वाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर, अमोल मोरे राहणार खेड तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर व इतर दोन इसम नाव पत्ता माहीत नाही हे अवैधरित्या यांत्रिक बोटीच्या साह्याने विनापरवाना वाळू उपसा करून वाळू चोरी करीत आहे अशी खात्रीशीर बातमी श्री मयुर भुजबळ यांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी कारवाई करण्याकामी दौंड तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने मौजे राजेगाव गावच्या हद्दीत भीमा नदीच्या पात्रात तालुका दौंड जिल्हा पुणे येथे छापा घातला असता सदर ठिकाणी 60 लाख रुपये किमतीच्या वाळूउपसा करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक फायबर बोटी मिळून आल्यास त्या जागीच महसूल कर्मचारी यांच्या मदतीने जिलेटिन च्या साहाय्याने स्फोट घडवून नष्ट करून टाकल्या असून सदर इसमान विरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९,४३९,३४ सह गौणखनिज अधिनियम कलम ४,२१, पर्यावरण सरंक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ वसार्वजनीक मालमत्ता विद्रुपीकरण कलम ४ , मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे कायदेशिर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हे सहाय्यक फौजदार संतोष शिंदे दौंड पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई

माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली परि पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ,पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस अंमलदार विशाल जावळे, किरण डुके, गणेश कडाळे, सागर गायकवाड, योगेश कर्चे यांनी केली आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: