हुतात्मा दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने हुतात्मांना आदरांजली
जळगाव.दि.30 :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानुसार आज दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठिक 11.00 वाजता हुतात्मांच्या स्मरार्थ आदर व्यक्त करण्यासाठी भोंगा वाजवून दोन मिनिटांसाठी मौन (स्तब्धता) पाळण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, […]
रोटरी क्लब चाळीसगाव व वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने हृदयविकार आणि सांधेदुखी तपासणी शिबीर
चाळीसगाव चाळीसगाव(प्रतिनिधी): रोटरी क्लब चाळीसगाव व वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी बापजी जीवनदीप मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल येथे सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत “हृदयविकार आणि सांधेदुखी तपासणी शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नाशिक येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विजयसिंह पाटील व ख्यातनाम सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. जयेश सोनजे यांच्या […]
पुढारी हरविले आहे,शोध मोहीम सुरू
चाळीसगाव (प्रतिनिधी): आज दिनांक ३० रोजी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मिळून वामन नगर चाळीसगाव येथील स्थानिकांना सोबत घेऊन निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे वामन नगर बोगद्याच्या काम नाही,गटारी ,पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन यांचे काम नाही ,फक्त पुढारी आलेत आश्वासन दिलीत पण काम मात्र झाले नाही आम्हाला असे वाटते पुढारी हरविले आहे त्यांना शोधून आठवण करून द्यावी […]
आता सरपंच ची निवड सदस्यांमधून
मुंबई, दि. 29 : सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम 7, कलम 13, कलम 15, कलम 35, कलम 38, कलम 43, कलम 62, कलम 62 […]
सांस्कृतिक कार्यक्रमातून संस्कृतीचे जतन व व्यक्तिमत्व विकासाला चालना-किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन
एरंडोल(प्रतिनिधी):-दिनांक २८ जानेवारी २०२० एरंडोल प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर तालुका एरंडोल येथील शाळेत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन प्रसंगी आदिवासी वस्तीवर उत्साह संचारला होता. यावेळी शाळेला ५०० रुपये बक्षीस मिळाले. सांस्कृतिक कार्यक्रमातून व स्नेहसंमेलनातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास होतो जिल्हा परिषद शिक्षण समिती द्वारे हा चांगला उपक्रम सुरू करण्यात […]
चाळीसगाव येथे CAA व NRC च्या विरोधात धरणे आंदोलन महिलांचा सहभाग
चाळीसगाव(प्रतिनिधी): दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत नगरपालिका मंगल कार्यालय हजरत अली चौक चाळीसगांव येथे CAA व NRC च्या विरोधात एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम महिला उपस्थित होत्या हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे असे निवेदन शानए हिन्द निहाल अहमद(मालेगांव),डॉ अरशीन (धुळे),आफ्रिन अन्वर शेख, रिजवना कैसर अहमद […]
टिक टॉक विडिओ केला,चालक घरी गेला?कारवाही योग्य की अयोग्य?
अधिकार आमचा (विशेष)- पीएमपी च्या ई बस चालक भीमराव गायकवाड यांना टिक टॉक व्हिडिओ तयार केले म्हणून बडतर्फ करण्यात आले, बातमी कळताच मनात विचार आला की हे योग्य आहे की अयोग्य माहीत नाही पण कर्मचारी पण शेवटी माणूसच ना म आजच्या या इंटरनेट च्या युगात तर आमच्या आतील कलाकार बाहेर येणारच आणि जर थोडी कलाकारी […]
शिवभोजन थाळीचा पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी घेतला लाभ-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई दि. २७ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात काल शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.श्री.भुजबळ म्हणाले, राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु […]
वीर एकलव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल पन्नालाल मावळे व त्यांच्या टिम चा प्रजासत्ताक दिनी शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडा येथे सत्कार
पिंगळवाडा- श्री पन्नालाल मावळे यांना वीर एकलव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल आज २६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडा येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री एम डी पिंगळे सरांच्या हस्ते पन्नालाल मावळे सह नंदाबाई मावळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री मावळे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री पि पि चव्हाण सर, आदिवासी […]
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव येथे शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ
जळगाव, दि. २६(प्रतिनिधि) :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात आजपासून शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गत शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते […]