जातीय सलोखा कायम ठेवावा अफवांना बळी पडू नये-पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब.

Read Time59 Second

प्रतिनिधी(औरंगाबाद):-दि 28 फेब्रुवारी 2020 शुक्रवार रोजी औरंगाबाद नवापुरा येथे जिंसी पोलीस स्टेशन च्या वतीने जातीय सलोखा निमित्ताने शांतता कमिटी ची बैठक घेण्यात आली यावेळी जिंसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब,मुजाहेद खान,मोहम्मद रफिक,जयसिंग हुलीया व नवापुरा भागातील नागरिक उपस्थित होते यावेळी जातीय सलोखा कायम राखण्याचे व अफवांना बळी पडू नये तसेच कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होईल असे काही सोशल मीडिया वर शेअर करू नये असे आव्हान पोलीस निरीक्षक केंद्रे साहेबांनी केले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

Read Time1 Minute, 48 Second

जळगाव, दि. 28 :- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..
शनिवार, दि. 29 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता पाळधी तालुका धरणगाव येथे राखीव. दुपारी 12.00 वाजता केळी महामंडळ विषयाबाबत चर्चा बैठकीस उपस्थिती, स्थळ- केळी संशोधन केंद्र, निमखेडी रोड, जळगाव. सोईनुसार धार्मिक कथा कार्यक्रमास उपस्थिती (संदर्भ – आमदार श्री. राजू (मामा) भोळे, स्थळ-जीएस ग्राउंड, जळगाव. दुपारी 4.00 वाजता शेतमाल निर्यात संधी या विषयी कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून उपस्थिती. आयोजक-ॲग्रोवर्ल्ड, जळगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जळगाव. संपर्क-प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव-0257/2232585 स्थळ- जिल्हा नियोजन सभागृह, जळगाव. सोईनुसार- ग्लोबल हायस्कुल, पाळधी येथील शाळेचे स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यास उपस्थिती. सायं 7.00 वाजता नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती. संपर्क- रामचंद्र पाटील, स्थळ-वाघनगर, ता. जि. जळगाव. सोईनुसार- पाळधी, तालुका धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण व राखीव.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा भारतीय संस्कृती व परंपरा जोपासण्यात मराठी भाषेचे महत्वपूर्ण योगदान-जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील

Read Time6 Minute, 38 Second


जळगाव, दिनांक 27 : भारतीय संस्कृती व परंपरा जोपासण्यात मराठी भाषेचे महत्वपूर्ण योगदान आहे. मातृभाषा मराठीला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माणून प्रत्येक मराठी माणसाने तीचा मान, सन्मान आणि तीची अस्मिता शेवटच्या श्वासापर्यंत जपावयास हवी. असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी केले.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून शासनातर्फे साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व. वा. वाचनालयाचे सचिव मिलींद कुलकर्णी, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडीत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गणेश शिवदे, नुतन महाविद्यालयाचे मराठी विषयाचे निवृत्त शिक्षक बी. आर. पाटील, ‘अशी शिका मराठी भाषा’ या पुस्तकाचे लेखक अे. अे. खान, व. वा. वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. अत्रे, विविध ग्रंथालयाचे व्यवस्थापक, प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, व. वा. वाचनालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले की, मराठी भाषेला आपण आईचा दर्जा दिला आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मुलगा आपल्या आईचा शेवटपर्यंत मान, सन्मान आणि आत्मसन्मान बाळगतो त्याचप्रमाणे मराठी भाषेचा आदर व्यक्त करण्यासाठी विशेष औचित्याची आवश्यकता भासू नये, मराठी भाषेचा आत्मसन्मान प्रत्येक नागरीकाच्या हृद्यात असावयास पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व, हा दिन आयोजनामगील शासनाची भूमिका सांगून दैनंदिन जीवन जगत असताना मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले. तसेच माहिती व जनसंपर्क विभागाने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेले लोकराज्य मासिकाचा अंक देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
नुतन मराठा महाविद्यालयातील मराठी विषयाचे निवृत्त शिक्षक बी. आर. पाटील यांनी ज्ञानाचे उगमस्थान मराठी भाषा आहे. समाजातील सर्व घटकांना हे पटले पाहिजे, केवळ प्रतिष्टेपोटी इंग्रजी भाषेच्या मागे न धवता आपल्या माय मराठी भाषेचे संवर्धन करून शिक्षण, संस्कार, शिष्टाचार हे गुण अंगिकारण्यासाठी प्रत्येक नागरीकाने मराठी भाषेची कास धरणे आवश्यक असल्याचे सांगितले.
उपशिक्षणाधिकारी गणेश शिवदे यांनी शिक्षणात मराठी भाषेचे महत्व स्पष्ट करून आता शासनानेही प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकविणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत शिकविण्याचे आवाहन केले. अशी शिका मराठी भाषा या पुस्तकाचे लेखक अे. अे. खान यांनी मराठी भाषेच्या अनेक गोडव्यांविषयी उदाहरणे दिलीत.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर कवि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मिलींद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सरस्वती पुजन जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित यांनी केले. शेवटी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी मराठी भाषा बोलणे, लिहिणे आणि जीवनात अंगिकारण्याबाबतची तर दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढण्यासाठी दैनिक लोकमततर्फे तयार केलेली शपथ मिलींद कुलकर्णी यांनी उपस्थितांना दिली.
मराठी भाष गौरव दिनानिमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनात कवि कुसुमाग्रजांच्या लेखनसाहित्यासह इतर सर्व मान्यवर लेखकांचे ग्रंथ वाचकांसाठी ठेवण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनास वाचक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी तर उपस्थितांचे आभार व. वा. वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. अत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील रामकृष्ण कोळी, दिलीप खैरणार, भूषण सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या तीस रिक्षा जप्त परिवहन विभागाची धडक कारवाई

Read Time3 Minute, 3 Secondजळगाव, दिनांक 27: शहरातील सेंट टेरेसा, आर. आर. हायस्कुल, गुरुकुल विद्यालय (इंग्लिश मिडीयम), सेंट लॉरेन्स, वर्धमान, ओरियंत या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा व व्हॅनमध्ये कोंबून बेदरकारपणे आणि धोकादायकपणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने आज धडक मोहिम राबवून कारवाई करण्यात आली. या मोहिमेतंर्गत तीस ऑटो रिक्षा व व्हॅन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येते जप्त करण्यात आल्या आहेत. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.
उप प्रादेशिक परिवहन विभागच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत बऱ्याचश्या रिक्षा व व्हॅनमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक पटीने विद्यार्थ्यांना कोंबून बसविल्याचे आढळून आले, तसेच अनेक विद्यार्थी चालकाच्या सीटवर बसलेले आढळून आले. काही मुलांचे हात, पाय वाहनाच्या बाहेर आलेले आढळून आले. एका व्हॅनमध्ये 24 मुले धोकादायकपणे प्रवास करतांना आढळून आले. अशा प्रकारच्या वाहनावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मोहिमेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयामधील मोटर वाहन निरीक्षक सचिन दळवी, विकास सूर्यवंशी, दीपक ठाकूर आणि सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.
ज्या ज्या शाळेच्या परिसरात धोकादायकपणे वाहतूक करण्यात येते अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा शाळेच्या प्राचार्यांना या मोहमेअंतर्गत समज देण्यात आली आहे. स्कूल बस समितीचे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी प्राचार्यांची असून अशा प्रकारची वाहतूक होऊ नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे स्कूल बस मधूनच यावी याबाबतचे त्यांनी नियोजन करण्याची आश्यकता असल्याचेही त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोहि यांनी कळविले आहे.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Read Time5 Minute, 29 Second


जळगाव, दि. 24 :- ग्रामपंचायत पासून महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यलयांमार्फत नागरिकांकडून विविध प्रकारच्या कर आकारणी केली जाते. प्रशासनात काम करताना प्रत्येक शासकीय, निमशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी तो आपल्या कामाचा एक भाग म्हणून काम करत असतात प्रशासनातील सर्वच घटकांनी शासनाचा महसूल गोळा करताना करदाते नागरिक हे आपले ग्राहक आहेत याउद्देशाने त्यांच्या मुलभूत हक्काला प्राधान्य द्यावे व आपले कर्तव्य व जबाबदारीची योग्य प्रकारे सांगण घालावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्यांना उद्देशून केले.
याप्रसंगी शासकीय सदस्य म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी बी. ए. बोटे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यो. को. बेंडकुळे, वैधमापन शास्त्र विभागाचे स.म.बांगर, दूरसंचार विभागाचे व्ही.एस.महाजन, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी एस. आर. पाटील, महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील यांचेसह अशासकीय सदस्य म्हणून सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद मंत्रालय, मुंबई विकास उमराव महाजन, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य/ सदस्या सर्वश्री / श्रीमती सौ.पल्लवी पुरूजित चौधरी, ॲङमंजुळा कचरुलाल मुंदडा, साहित्यीक अ. फा. भालेराव, बाळकृष्ण गंगाधर वाणी, शिवाजीराव अहिरराव, सतिष दगडू देशमुख, सुरेश परशराम रोकडे, नरेंद्र बाळू पाटील आदि अधिकारी, कर्मचारी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, शहरात तसेच जिल्ह्यात अनोंदणीकृत अनेक रिक्षा आढळून येतात. त्यांचेवर कारवाई सुरु असून आतापर्यत परिवहन विभागाने अशा रिक्षांवर कारवाई केल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी बैठकीत दिली. तसेच ज्या रिक्षांची नोंदणी केलेली नाही अशा रिक्षा तातडीने स्क्रॅप करण्यात येत असल्याचेही बैठकीत सांगितले. अनेक रिक्षाचालक परवानगीपेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरीकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविताना तसेच जे रिक्षाचालक नियमांचे पालन करतात. त्यांच्या रिक्षातून पाठवावे. अथवा शाळेच्या स्कुल बसमधूनच पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी बैठकीत करून परिवहन विभागाने अनधिकृत वाहतुकीला आळा घालण्यासाठी नागरिकांची मदत घ्यावी. त्यासाठी अवाजवी प्रवासी किंवा विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनाचे नागरिकांनी छायाचित्र काढून ते वाहतूक शाखेच्या पोलीस विभाग किंवा परिवहन विभागाकडे पाठविल्यास संबंधित विभागांनी त्याआधारे संबंधित वाहनांवर तात्काळ कारवाई करावी अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
नगरपालिका, महानगरपालिका प्रशासनांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील उघड्यावर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यावेळी दिल्यात. बैठकीत सुवर्णमहोत्सवी शिष्यवृती योजनेंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे अदागिरी तात्काळ होण्यास येणाऱ्या अडचणी तसेच मुद्रालोन विषयक तक्रारी ऐकून घेवून त्यावर तात्काळ मार्ग काढण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र वालझिरी येथे रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव श्री क्षेत्र वालझिरी वारकरी संस्थान पिंपरखेड व बापजी जीवनदीप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधोपचार

Read Time1 Minute, 42 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-दि. 21 फेब्रुवारी 2020, शुक्रवार रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र वालझिरी येथे रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव श्री क्षेत्र वालझिरी वारकरी संस्थान पिंपरखेड व बापजी जीवनदीप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधोपचार करण्यात आले. यामध्ये जवळजवळ 346 रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉक्टर सुधन्वा कुलकर्णी, नेत्र ज्ञ संदीप साहू डॉ. संदीप देशमुख, डॉ. विरजा देशमुख आदी डॉक्टरांनी सहकार्य केले. रोटे रोशन ताथेड, बलदेव पुंशी, यांचे विशेष सहकार्य लाभले. यामध्ये वेळोवेळी असेच लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचा मानस वालझीरी वारकरी संस्थान चे सचिव श्री सतीश देशमुख यांनी व्यक्त केला. आभार प्रदर्शनात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत बापजी जीवनदीप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल द्वारे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संदीप देशमुख यांनी केले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

ईश्वर अल्लाह एक है… राम रहीम एक है…! चा नारा देत तमाम धुळेकर जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा — आमदार डॉ. फारूक शाह

Read Time1 Minute, 47 Second

धुळे – शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निम्मित धुळे शहरातील अशोकनगर येथील श्री. प्रजापती ब्रम्हकुमारी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिव ध्वजारोहण कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणुन धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह हे उपस्थित होते. यावेळी आमदारांच्या हस्ते शिव ध्वजारोहण करण्यात आले. ईश्वर अल्लाह एक है… राम रहीम एक है चा नारा यावेळी आमदारांनी दिला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार फारूक शाह यांनी धुळेकर जनतेला महाशिवरात्रीच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह हे होते. तर गुरुद्वाराचे प्रमुख श्री. धिरजीसिंग बाबा, मनपा स्थायी समिती सभापती श्री. सुनील बैसाणे, नगरसेविका सौ. सुरेखाताई ओगले, श्री. ब्रह्मकुमारीज चे कुमारी दिदी, प्रेमिला दिदी, कमल दिदी, रश्मी गोराणे, गणपतभाई चौधरी, स्मिता चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला श्री. प्रजापिता ब्रम्हकुमारीचे भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

छत्रपती शिवराय रयतेचे जाणते राजे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांचे एरंडोल शिवजयंती उत्सव प्रसंगी प्रतिपादन

Read Time6 Minute, 4 Second


एरंडोल(प्रतिनिधी):-दि 19 फेब्रुवारी 2020 रोजी एरंडोल येथे ,सार्वजनिक शिवजयंती उत्सव प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सालाबादाप्रमाणे माल्यार्पण झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मनोगते व्यक्त झाली. यावेळी उपस्थित एरंडोलच्या तहसीलदार अर्चना खेतमाळीस म्हणाल्या की, राजे छत्रपती शिवराय हे सर्व रयतेला व सर्वसामान्यांना आधार वाटणारे जाणते राजे होते . त्यांच्या जन्म मुळे आपल्याला स्वराज्य लाभल . छत्रपती शिवरायांची कार्यपद्धती प्रत्येकाने जगण्याची गरज आहे.
त्यांचे विचार आजही शासन-प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील सर्वांना दिशा देणारे आहे त. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगरीचे माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ महाजन होते. व्यासपीठावर एरंडोल पोलीस स्टेशनचे पीआय स्वप्निल ऊनवणे, एरंडोल नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण देशमुख, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्क्ष राजू आबा चौधरी, किशोर भाऊ निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमित दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजय भाऊ महाजन, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव, माजी उपनगराध्यक्ष शालिक भाऊ गायकवाड, विद्यमान उपनगराध्यक्ष बबलू चौधरी पैलवान नगरसेवक योगेश महाजन नगरसेवक अभिजित पाटील युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, ईश्वर बिऱ्हा डे, जगदीश दादा ठाकूर, शिवसेनेचे रमेश आण्णा महाजन, डॉक्टर सुरेश दादा पाटील,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश दादा पाटील, पंचायत समितीचे सदस्य विवेक भाऊ पाटील, आर डी पाटील,प्राध्यापक आर एस पाटील, मराठा सेवा संघाचे एरंडोल तालुका अध्यक्ष तथा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर, राजेंद्र शिंदे पालिकेचे कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ, रवी अण्णा महाजन,सुकलाल महाजन, अजय पाटील, स्वप्नील सावंत, नंदू भाऊ जगताप, माजी नगरसेवक नरेंद्र पाटील, ग्रामीण उन्नती मंडळाचे सचिन भाऊ विसपुते,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना एरंडोल पोलीस स्टेशनचे पीआय स्वप्नील सोनवणे म्हणाले की,छत्रपती शिवरायांची जयंती व सर्वच यांच्या एरंडोल शहरात शांततेत सर्व जयंत्या सर्व समावेशाने साजरी होतात ही एरंडोल ची खासियत महत्त्वपूर्ण आहे. यानंतर पालिकेच्या वतीने बोलताना छत्रपती शिवराय असे एकमेव राजे होऊन गेले कि पिढ्यानपिढ्या त्यांचे नाव अजरामर राहील असे
पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी आपल्या भाषणात म्हटले.
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित दादा पाटील यांनी छत्रपती शिवरायांनी त्याकाळात मावळ्यांना एकत्रित करून उभारलेल स्वराज्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले.
प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केल. आभार गजानन पाटील यांनी व्यक्त केले.अध्यक्ष मनोगतात माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ महाजन यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराने सर्वांनाच प्रेरणा मिळते असे म्हटले. यावर्षी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ वंदन केले माता बहिणीची संख्या लक्षणीय होती.रॅलीद्वारे येऊन शोभायात्रा द्वारे संपूर्ण शहरात छत्रपती शिवरायांचा जयघोष केला. सालाबादाप्रमाणे दुपारी चार पासून राजे छत्रपतींच्या सजीव देखावेद्वारे व सामाजिक बांधिलकीच्या संदेश देणारे फलक आदीसह हजारो युवक समाजबांधव व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे उपस्थित भव्य मिरवणूक शहरातून निघाली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजे संभाजी पाटील मित्र मंडळ एरंडोल चे सर्व पदाधिकारी, सकल मराठा समाज ,मराठा क्रांती मोर्चा ,संभाजी ब्रिगेड , एरंडोल शहरातील सर्व मराठा समाज बांधव आदींनी परिश्रम घेतले.

.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

चर्मकार उठाव संघ व सेवा योग बहुद्देशीय संस्थे तर्फे आगळी वेगळी जयंती साजरी

Read Time1 Minute, 21 Second


चाळीसगाव:- चर्मकार उठाव
संघ व सेवा योग बहुद्देशीय संस्था चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आगळ्यावेगळ्या पद्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली अंध शाळेतील मुलांना फळे आणि माध्यमातून अंध शाळेचे मुलांन सोबत फळे आणि मिष्टान्न वाटप करुन शिव जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले नंतर फळे वाटप करण्यात आली यावेळी प्रदेश अध्यक्ष मोतीलाल अहिरे नगरलिकेचे माझी बांधकाम सभापती अरुण बापू आहिरे, शहराध्यक्ष आंनद गांगुर्डे, देवेंद्र गांगुर्डे, खुशाल मोरे ,संकेत मोरे, कृष्णा वाघ,खुशाल भोई,गफ्फार शेख, राहुल नकवाल, कल्पेश येवले, समीर शेख ,रोहित शिंदे, राहुल मोरे, विशाल कोळी,दिनेश पाटील,भैया मोरे,भारत अहिरे, आदी उपस्थित होते

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

चाळीसगाव MIM शहराध्यक्ष पदी मुखतार खान बिस्मिल्ला खान कुरेशी यांची निवड

Read Time1 Minute, 1 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी): दि 14 फेब्रुवारी 2020 रोजी MIM चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ अब्दुल गफ्फार कादरी यांच्या हस्ते औरंगाबाद येथे मुखतार खान बिस्मिल्ला खान कुरेशी यांना MIM चाळीसगाव शहर अध्यक्ष पदी नियुक्ती चे पत्र देण्यात आले यावेळी चाळीसगाव शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीनंतर मुखतार खान बिस्मिल्ला खान कुरेशी यांचे सर्व MIM च्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ अब्दुल गफ्फार कादरी यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %