दौंड(पवन साळवे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला असून व कोरोणाच्या विळख्यातून जनतेला कसे निरोगी ठेवता येईल या उद्देशाने पोलीस प्रशासन नवनवीन उपाययोजना काढत असताना काही महाभाग अडचणी निर्माण करताना दिसून येत आहे.असाच एक प्रकार दौंडमध्ये घडला आहे दौंड येथील कुरकुंभ मोरी येथे दौंड पोलिस प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती दौंडमध्ये काही टवाळखोर त्या मार्गाने प्रवेश करत असतात व विनाकारण फिरतात याला आळा घालण्यासाठी दौंड पोलिसांनी लढवली असता त्याच अनुषंगाने त्या मोरीला बंद करण्यात आले होते पण काही टवाळखोरांना या भयानक विषाणूचे गांभीर्य नाही असेच दिसत मध्य रात्री दौंडमधील रोज रात्री कोणीतरी अज्ञात इसम मोरी उघडत असल्यामुळे स्वतः कर्तव्यदक्ष पो ना रोटे यांनी मोरी वेल्डिंग करून घेतली व पुन्हा रस्ता बंद करण्यात आला व जर कोणी जाणूनबुजून जनतेला व पोलीस प्रशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.
![](http://adhikaraamcha.com/wp-content/uploads/2020/04/PicsArt_04-24-09.35.43-1024x1024.jpg)