दौंड(पवन साळवे) संपूर्ण जगात कोरोना वायरस ने हाहाकार माजला आहे सर्व यंत्रणा हतबल झाले आहे परंतु तरीही सर्व सरकारी यंत्रणा आपापली जबाबदारी पार पाडत आहे.व सामाजिक राजकीय स्वयंसेवी संस्था जनतेच्या मदतीसाठी धाऊन आले आहे ज्या ज्या ठिकाणी काही कामगार असो वा प्रवासी त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येत आहे.दौंडमध्ये कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहे.दौंड शहरात अडकलेल्या प्रवाश्यांची सोय योग्य पद्धतीने घेतली जात आहे सरकारी कामकाजात रुजू असतानाही एक स्वयं सामाजिक जबाबदारी म्हणून दौंड तहसीलदार मा:संजय पाटील यांच्या मदतीने व सहकारी यांच्या वतीने संत तुकडोजी महाराज विद्यालय येथे काही बीड व लातूर मधील अडकलेल्या प्रवाश्यांना अन्न धान्याचे वाटप केले.