लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर सेल गुन्हे दाखल केले ३३३ गुन्हे, १५२ जणांना अटक. नागपूर ग्रामीण व पुणे ग्रामीण मध्ये नवीन गुन्ह्यांची नोंद. आक्षेपार्ह व्हाट्सएप मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी १३८ गुन्हे, फेसबुक पोस्ट्स शेअर १२५,टिकटोक विडिओ शेअर १० व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट ६, इन्स्टाग्राम द्वारे चुकीच्या पोस्ट ४, तर अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४९ गुन्हे दाखल. ६० आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश.गुन्ह्यांमध्ये बीड २९,पुणे २७, जळगाव २६,मुंबई २०, कोल्हापूर १६, सांगली १२, नाशिक १२, नाशिक शहर ११,जालना ११, सातारा १०, बुलढाणा १०,लातूर १०, नांदेड ९,पालघर ९, ठाणे शहर ८,परभणी ८, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, अमरावती ७, ठाणे ७, हिंगोली ६, नागपूर शहर ६ या प्रमुख जिल्हे-शहरांचा समावेश.