चाळीसगाव(प्रतिनिधी):-दि 15 एप्रिल वारंवार समजावून सुद्धा लोक ऐकत नाही म्हणून पोलीस प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत,घेतले जाणारे निर्णय आमच्या हिताचे आहे हे आम्ही समजायला हवे,
आज रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विजयकुमार ठाकूरवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ पवार, विनोद खैरनार, विजय पाटील व सतीश राजपूत या पथकाने आज रोजी सकाळी 08:30 वाजताचे सुमारास चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पवार वाडीतील मुंदडा हॉस्पिटल जवळील ” श्री हेअर पार्लर ” येथे सलून दुकान हे जीवनावश्यक वस्तूंची आस्थापना नसताना देखील खुले ठेवून त्यात सलूनचे दुकानात 2 इसम सलून दुकान चालू ठेवून , त्यात गिर्हाइकाचे केसांना डाय करताना मिळून आले म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चाळीसगाव पोलीस स्टेशनला संचारबंदी व जीवनावश्यक वस्तू नसताना हेअर पार्लर उघडे ठेवून वापर करणे यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे-
1) राजेश नथु महाले,
वय- 45 वर्षे , राहणार -पवारवाडी चाळीसगाव.
2) विलास रामकृष्ण कासार
वय- 55 वर्षे , राहणार- शेजवलकर नगर, भडगाव रोड, चाळीसगाव
चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने घरातुन विनाकारण बाहेर न पडण्याचे व जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर दुकाने खुली न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.