दौंड(प्रतिनिधी):-कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील लॉक डाऊन दोन आठवड्यांनी (दिनांक 4 मे 2020 ते 17 मे 2020 पर्यंत) वाढविण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने असा निर्णय घेण्यात आला आहे की भारतीय रेल्वेवरील सर्व प्रवासी रेल्वे सेवा दिनांक 17 मे 2020 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, म्हणजेच सर्व मेल / एक्स्प्रेस (प्रीमियम गाड्यांसह) ), प्रवासी गाड्या, मेट्रो रेल्वे, कोलकाता च्या उपनगरी गाड्या 17-मे -2020 पर्यंत रद्द करण्यात आले आहेत. मालगाड्या आणि पार्सल विशेष गाड्या चालू राहतील.
स्थानकावर विनाकारण गर्दी करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असे आव्हान मध्य रेल्वे सोलापूर विभागाने केले आहे.
मध्य रेलवे मंडल रेल प्रबंधक कार्यालय,
वाणिज्य शाखा सोलापूर