दौंड शहरात वाढते रुग्ण,दौंडकरांना सावध राहण्याची गरज

Read Time49 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड शहरामध्ये पुन्हा कोरोना रुग्ण सापडले पानसरे वस्ती येथे दोन , नेहरू चौक येथे दोन , तुकाई नगर एक व गुलमोहर अपार्टमेन्ट एक असे एकुण सहा रूग्ण कोरोना पॉसिटीव्ह आपले आहेत.या मधे चार पुरूष व दोन महीलांचा समावेश आहे.व सर्व जवळ पास तीस ते ऐकोणपन्नास वयोगटातील आहेत.अशी माहीती डाँ.संग्राम डांगे यांनी दिली. तसेच नगरपालीकेच्या कर्मचार्यानी रुग्ण मिळालेले सर्व भाग सील केले आहे.

12 1
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंडवरील कोरोना संकट,आणखी दोन रूग्ण पाँझिटीव्ह.

Read Time1 Minute, 2 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी-विजय जाधव(दौंड)

महाराष्ट्रात कोरोणाची वाढती संख्या म्हणजे शासनाची परीक्षाच हे काही नाकारता येत नाही.दौंड तालुक्यातील मलठन येथील ४३ वर्षीय इसमाला २७/०६/२०२० रोजी त्रास जाणवत असल्याने लोणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता आज त्यास कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले तर वरवंड येथील ४० वर्षीय इसमाचे घशातील द्रव घेतले असता आज त्यांचा तपासणी अहवाल पोझिटिव्ह आल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे यांनी दिली.
शहर रुग्ण संख्या-१००
तालुका-३२
एकूण दौंड रुग्ण संख्या-१३२.

14 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

“जागतिक डॉक्टर्स डे” निमित्त डॉक्टरांच्यासह पोलीस आणि सफाई कामगारांचेही सत्कार करा – उमेश चव्हाण

Read Time2 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

पुणे – सध्याच्या परिस्थितीत अनेक तथाकथित संस्था आणि संघटना अनेकांना ‘करोना योद्धा’ म्हणून डिजिटल प्रमाणपत्रे वाटत आहेत. यातील वाटणाऱ्या संस्था आणि सोयीस्कर स्वीकारणारे योद्ध्ये या दोन्हींच्या कामातील सत्यता आणि विश्वासहार्यता याबाबतीत अनेक शंका उपस्थित झालेल्या दिसतात.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनच्या काळात खरे योध्ये म्हणून काम करणारे डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत आणि सफाई कामगार आहेत. या सर्वांचा यथोचित सत्कार रूग्ण हक्क परिषदेने करावा, असे अवाहन परिषदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्याना केले आहे.
अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, रूग्ण हक्क परिषदेच्या वतीने गेली अनेक वर्षे “जागतिक डॉक्टर्स डे” निमित्ताने प्रातिनिधिक तत्वावर महाराष्ट्र राज्यातील उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या डॉक्टरांना पुरस्कार आणि सत्कार समारंभ आयोजित केले जातात. यावर्षी डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार यांनी प्राणांची बाजी लावून केलेल्या कार्यास सलाम म्हणून सर्वांचे आभाराचे पत्र देऊन, गुलाब पुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त करावी. बुधवार १ जुलै २०२० जागतिक डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
केंद्रीय कार्यालय सचिव दीपक पवार यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खऱ्या करोना योद्ध्याना गौरवतील असे म्हटले आहे!

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड शहरात पुन्हा दोन रुग्ण पॉसिटीव्ह…

Read Time1 Minute, 4 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

काही वेळा पूर्वी दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील 32 रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता पण हा आनंद काही क्षणात नाहीसा झाला पुन्हा दौंडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे, दौंड शहरात दोन रूग्ण कोरोना पाँझीटीव्ह आढळले आहेत,दौंड शहरामध्ये तूकाई नगर या भागात एक ४४वर्षिय महीला व पानसरे वस्ती या भागातील ७५ वर्षीय पुरूष असे दोन रुग्ण पॉसिटीव्ह आले आहेत.यांची तपासणी चा अहवाल आज मिळाला असल्याची माहीती डॉ संग्राम डांगे यांनी दिली. तसेच नगरपालीकेच्या कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणून दोन्ही परिसर सील केले आहेत.

9 1
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी…

Read Time1 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

कोरोनाची वाढती संख्या दौंडकरांच्या चिंतेत वाढ करत होती पण दि 26/06/2020 रोजी दौंड ग्रामीण भागातील खुटबाव,केडगाव,बोरीपार्धी,पाटस, या भागातील 32 लोकांची चाचणी घेण्यात आली होती. व सर्व 32 संशयीतांचे स्वँब पुणे येथे तपासणी साठी पाठविण्यात आले होते ते आज दिनांक 27/06/2020 रोजी अहवाल प्राप्त झाला असून सर्वच तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दौंडकरांनी सुटकेचा निःस्वास सोडला आहे , तरी आपण आपली काळजी घ्यावी व शासन नियमांचे पालन करावे घरी रहावे, काही काम असल्यास घराबाहेर पडावे,आपली व आपल्या लोकांची काळजी घ्यावी अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी दिली.


5 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

तोंडाला मास्क लावला नाही म्हणून तरुणाला मारहाण

Read Time1 Minute, 34 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

अधिकार आमचा – चिंचवड येथील आंनदनगर येथे तोंडाला मास्क का लावला नाही म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आकाश बाळू पालके (वय 28 रा. आनंदनगर,चिंचवड) या तरुणाला मारहाण करण्यात आली व तुला बघतोच अशी धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी भास्कर गायकवाड, अतिश जगताप, प्रेम जगताप
(सर्व राहणार आनंद नगर,) यांच्या विरोधात चिंचवड पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मारहाण झालेल्या तरुणाचा भाऊ अजय बाळू पालके (वय, 26, रा. आनंद नगर,
चिंचवड) यांनी या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय यांच्या
भावाने तोंडाला मास्क लावला नव्हता. त्यामुळे आरोपींनी
फिर्यादीच्या भावाला मास्क का लावला नाही असा जाब
विचारला. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व
तुला बघतोच अशी धमकी दिली.
याप्रकरणी पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहे

6 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

मोटार सायकल अपघात 1चा मृत्यू 1 जखमी,अपघातानंतर ट्रकचालक फरार अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल

Read Time2 Minute, 1 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील लिंगाळी रावणगाव रोड मसनेरवाडी जवळ भीषण अपघात झाला त्या अपघातात एक ठार व एक जण गंभीर जखमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेच्या पोत्यानी भरलेला मालवाहतूक करणाऱ्या ट्रक क्र MH 42 B 9931 व होंडा शाइन क्र MH 42 AY 2079 या गाडीचा समोरासमोर अपघात होऊन यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून जखमी झालेल्या व्यक्तीला दौंड शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सविस्तर माहिती अशी की ट्रक चालक दौंड शुगर कारखान्याकडून दौंडच्या दिशेने निघाला होता तर दुचाकी वर असलेले आई व मुलगा दौंड कडून आपल्या गावे हिंगणी बेर्डी ता. दौंड या ठिकाणी निघाले होते पण लिंगाळी हद्दीतील मसनेरवाडी ओढ्याजवळ वळणाला समोरासमोर धडक होऊन यामध्ये नितीन गौतम माने वय वर्ष 20 मुलाचा मृत्यू झाला असून आई सुलाबाई गौतम माने वय वर्षे 45 गंभीररीत्या जखमी झाले आहे. सदर मालवाहतूक ट्रक शेजारील ओढयात मध्ये जाऊन कोसळला आहे . अपघातानंतर ट्रकचालक फरार असून अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलीस करत आहे.

4 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण वाढ कोरोना हॉटस्पॉटमधील गर्दीवर आता ‘ड्रोन’द्वारे नजर

Read Time3 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण
वाढ कोरोना हॉटस्पॉटमधील गर्दीवर आता ‘ड्रोन’द्वारे
नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड पालिका पोलीस प्रशासनाची
मदत घेणार आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात
नाही. अशा ठिकाणी कडक कारवाई करण्याचा इशारा
महापालिकेने दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चे रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहे.
शहराच्या विविध भागात रुग्ण वाढत आहेत.
आनंदनगर झोपडपट्टी, दापोडी, नेहरुनगर, विठ्ठलनगर,
भाटनगर, बौद्धनगर, रमाबाईनगर, वैभवनगर साईबाबानगर,
अजंठानगर, दिघी, बोपखेल, काळेवाडी हे भाग कोरोनाचे
हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
दाट लोकवस्त्या, लहान घरे यामुळे अजूनही लोकांची वर्दळ
दिसून येत आहे. या भागातील नागरिकांकडून नियमांचे पालन
केले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका
आहे. त्यासाठी कंटेन्मेंट झोन आशा ठिकाणी लोकांच्या हालचालींवर आता ड्रोनद्वारे लक्ष
ठेवण्यात येणार आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली, शहरातील हॉटस्पॉट
भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होत आहे. त्या भागात
‘कंटेनिंग’ करणे आवश्यक आहे. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढविण्यात येणार आहे.
त्याबाबत पोलिसांशी चर्चा झाली आहे. तिथे ड्रोनचा पण वापर
करण्याचा विचार केला आहे. ड्रोनद्वारे कंटन्मेंट झोनवर लक्ष
ठेवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन
केले जात नाही. आशा ठिकाणी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली
जाणार आहे.
नियमांचे पालन केले जात नसल्याने पिंपरी कॅम्प बंद केले
आहे. अन्य ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास
आल्यास थेट तो भाग देखील सील केला जाणार आहे.
किमान तीन दिवसांसाठी सील केले जाईल. नागरिकांनी
आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.सार्वजनिक ठिकाणे
थुंकणे, मास्क न घालणा-यांविरोधात कारवाई केली जात आहे.
दंडाच्या रकमेतही वाढ केली असल्याचे आयुक्त श्रावण
हर्डीकर यांनी सांगितले.

4 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कोरोना च्या साथीमुळे बंद असलेल्या दौंड तालुक्यामधील मंडप ,लाईट, साऊंड व्यवसायिकांनी आमदार राहुल दादा कुल यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी दिले निवेदन

Read Time2 Minute, 39 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी : विजय जाधव, दौंड(तालुका)

गेल्या तीन महिन्यापासून संपूर्ण भारतभर कोरोना मुळे लोक डाऊन असल्याकारणाने सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत त्यामध्ये शुभकार्याच्या मुहूर्तावर लॉक डाउन झाल्यामुळे मंडप -लाईट – साउंड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे व कामगारांचे सुद्धा उपासमार होत आहे .याच अनुषंगाने राज्य सरकारकडून व्यवसायिकांना व कामगाराना आर्थिक मदत व्हावी, व भांडवल गोळा करण्यासाठी किंवा मटेरियल ची ने-आण करण्यासाठी वाहन कर्ज घेतलेल्या कर्जाची मुदत वाढ होण्यासाठी बँकेकडून सहकारी पतसंस्था व फायनान्स यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची मुदत वाढ करून कोणत्याही प्रकारची टक्केवारी वाढवू नये.

त्याच प्रकारे जो भाग प्रतिबंधीत नाही किंवा जो ग्रामीण भाग आहे ज्या ठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव नाहीये अशा ठिकाणी शासनाच्या आदेशाप्रमाणे काही शुभ कार्य चालू आहेत. या शुभ कार्य साजरा करण्यासाठी काही लोकांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दोन-बेस- दोन- टॉप रितसर परमिशन मिळावी व शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटी चे पालन आम्ही सर्व व्यावसायिक पालन करणारच आहोत तरीसुद्धा पोलिस प्रशासनाने सुद्धा आम्हा सर्व व्यावसायिकांना सहकार्याची भावना दाखवावी ही विनंती जेणेकरून व्यावसायिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळेल व पुढील येणाऱ्या सार्वजनिक गणेश व नवरात्र उत्सवा मध्ये सुद्धा याच पद्धतीने सहकार्य मिळावे असेदेखील या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना दौंड शहर व तालुक्यातील मंडप -लाईट -साऊंड व जनरेटर मधील काही मालक उपस्थित होते.

7 0
Happy
Happy
75 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
25 %
Surprise
Surprise
0 %

तथ्य योद्धा” या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सचिव पदी मा:शिवकुमार कांबळे यांची निवड

Read Time38 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क.

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंडचे रहिवासी व सामाजिक कार्यात अतुलनीय कामगिरी करणारे व समाजहिताच्या प्रत्येक कार्यात पुढे राहणारे मा:शिवकुमार कांबळे यांची”तथ्य योद्धा” या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या कार्याची पावती मिळाल्याने दौंडमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %