अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मध्ये वाहन चोरीचे गुन्हे करणा-या
चार चोरटयांना अटक करुन ५ चारचाकी व ९ दुचाकी अशी १४ वाहने जप्त
गुन्हे शाखा युनिट २ व ५ ची कारवाई ,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हदीमध्ये वारंवार घडणा-या वाहन चोरी गुन्हयांचे अनुषंगाने
मा.पोलीस आयुक्त श्री संदिप बिष्णोई सो वाहन चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध व्हावा या अनुषंगाने गुन्हे शाखेना
विशेष मोहीम राबवुन वाहन चोरांचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड यांनी वाहन चोरीचे गुन्हयातील आरोपींचा
शोध घेणेकामी पोलीस उप निरीक्षक एस डी निलपत्रेवार व पोलीस कर्मचारी यांचे विशेष पथक नेमुन सुचना
दिल्या होत्या. पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, चेतन मुंढे, जमीर तांबोळी व विपुल जाधव असे निगडी पोलीस
ठाणे हदीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, वाहन चोरीचे
गुन्हे करणारे सराईत चोरटे एका चोरीचे अॅक्सेस मोटर सायकल वरुन निगडी परिसरात संशयितरित्या फिरत
आहेत अशी बातमी मिळालेने भक्ती शक्ती चौक परिसरात सापळा लावला असतांना अॅक्सेस टू व्हिलर क्रमांक
एम एच १४ डीझेड ०५२६ वरुन दोन इसम भक्ती शक्ती चौकाकडून पवळे ब्रिजकडे भरधाव वेगाने निघालेचे
दिसल्याने त्यांचा पाठलाग करुन पकडले त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे १) आकाश उर्फ
पप्या राजेंद्र सांडभोर वय २५ वर्षे रा. अंकुश आनंद बिल्डींगच्या पाठीमागे संग्रामनगर झोपडपटी ओटास्किम
निगडी पुणे व २) सुजित उर्फ सुज्या भिवा गायकवाड वय २७ रा. संजयनगर
ओटास्किम निगडी पुणे असे असल्याची सांगुन वाहन चोरीचे गुन्हयांची कबुली दिली.त्यांना गुन्हे शाखा युनिट २
येथे आणुन सखोल तपास केला असता नमुद अॅक्सेस टू व्हिलर जुन महीन्यात प्रेमअंकुर सोसायटी यमुनानगर
येथुन चोरल्याची माहीती देवून वाहन चोरीतील मुख्य सुत्रधार बंडया उर्फ पुरुषोत्तम विर रा. नांदेड सिटी
सिंहगडरोड पुणे याचे सोबत यमुनानगर निगडी येथुन मारुती झेन, सनसिटी पुणे येथुन असेंट हुंदाई, दत्तवाडी पुणे
येथुन मारुती ८००, सिंहगडरोड वडगाव फाटा रोड येथुन मारुती झेन व ताथवडे उदयानाजवळुन ईस्टीम कार
अशी चारचाकी वाहने चोरलेची व एक दुचाकी अरबाज हुसेन तलफदार रा, ओटास्किम निगडी याने गेले चार
महीन्यापुर्वी ट्रान्सपोर्टनगर निगडी येथुन चोरली असल्याची माहीती दिली.पोलीस उप निरीक्षक एस डी निलपत्रेवार
व कर्मचारी यांनी आरोपीत यांचेकडून ५ चारचाकी व २ दुचाकी वाहने जप्त करुन एकूण ७ गुन्हे उघडकीस
आणले आहेत.
तसेच श्री. बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड यांचे
अधिकारी व कर्मचारी वाहन चोरटयांचा शोध घेत असतांना पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे व दत्तात्रय
बनसुडे यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, दोन इसम स्प्लेंडर गाडी घेवुन हॉटेल कृष्णा व्हेज जवळ,
किवळे गावाकडे जाणारे रोडचे लगत असलेल्या डांबरी रोडने जाणार असुन त्यांचेकडे असलेली गाडी चोरी
केलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट ५ कडील सपोनि राम गोमारे व पोलीस
कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर,
धनंजय भोसले व श्यामसुंदर गुट्टे यांनी सदर ठिकाणी सापळा लावला असतांना पोलीसांचा सुगावा लागलेने
आरोपी गाडी टाकुन पळुन जावु लागले त्यांना शिताफिने पकडुन ताब्यात घेतले असता त्यातील एका इसमाचे
नाव अक्षय दशरथ शिंदे, वय २० वर्षे, रा ऐ पत्राशेड, आजंठानगर, निगडी पुणे तर दुसरा इसम हा
विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आले आहे. त्यांना त्यांचेकडे असलेल्या गाडीबाबत विचारणा केली
असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना गुन्हे शाखा, युनिट ५ कार्यालय येथे आणुन त्याचेकडे सखोल
तपास केला असता अक्षय दशरथ शिंदे, वय २० वर्षे, रा ऐ पत्राशेड, आजंठानगर, निगडी पुणे याने
विधीसंघर्षग्रस्त बालकाचे मदतीने पिंपरी, वाकड, देहुरोड व कोथरुड परिसरामध्ये मोजमजा करण्याकरीता दुचाकी
वाहनांची चोरी केली आल्याचे सांगुन त्यांनी चोरी केलेली दुचाकी वाहने लपविलेली वाहने लपवुन ठेवलेले
ठिकाण दाखविले. सपोनि गोमारे व गुन्हे शाखा, युनिट ५ कडील कर्मचारी यांनी एकुण ०७ दुचाकी वाहने जप्त
करुन एकूण ७ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हे शाखा युनिट २ व युनिट ५ यांनी ५
चारचाकी वाहनांचे व ९ दुचाकी वाहनांचे असे एकूण १४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त श्री
रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा.श्री राजाराम पाटील
यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री.बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे, पोलीस उप निरीक्षक श्री संजय निलपत्रेवार, युनिट २
कडील पोलीस कर्मचारी पोहवा. शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, दिपक खरात,वसंत खोमणे,
मपोहवा उषा दळे, विपुल जाधव, चेतन मुंढे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, आतिष कुडके, नामदेव
राऊत,शिवाजी मुंढे,अजित सानप व युनिट ५ कडील पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदिप
ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, श्यामसुंदर गुट्टे, स्वामीनाथ जाधव,
फारुक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व
राजेंद्र कदम यांनी केली आहे.