अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
वित्तीय संस्थाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडीसाठी तगादा न लावणे लोन हप्त्यांमध्ये दिलेल्या सुविधा सवलतीचे पालन करणे याबाबत आदेश देण्याबाबत रिपब्लिकन सेनेतर्फे दौंड तहसीलदार व दौंड पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले
समाजातील विविध लोकांनी आपल्या विविध गरजा भागविण्यासाठी विविध बँका, संस्थान, महिला पुरुष बचत गट ,पतपेढ्या यांच्याकडून कर्ज प्रकरण करून कर्ज उचलले आहे ,कर्जाचे हफ्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थकलेले आहेत याकामी रिझर्व बँकेने अशा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने कर्जावरील हप्त्या मध्ये काही सवलती दिल्या आहेत .
परंतु काही बँका, संस्था ,बचत गट, पतपेढ्या ह्या कर्जदारांना संबंधित कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावत आहे या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या लोकडाऊन च्या कालावधी दरम्यान सर्वत्र कार्यालय ,कारखाने ,विविध दुकाने ही पूर्णतः बंद असल्याने लोकांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद होते, त्यांना या काळात उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते व शिवाय या कालावधीमध्ये त्यांच्याकडे असलेले बचतही उदरनिर्वाहासाठी वापरून संपलेले आहे तरीही या काळात काही लोकांनी उपासमारीचे दिवस काढले आहेत. काही लोकांनी तर स्थनिक लोकांकडून हातउसने रक्कम उचलेली आहे ,कित्येक कंपन्यांनी आपल्या कामगारांमध्ये कपात केलेले आहे अशा लोकांनी कर्जाची परतफेड कशी करायची हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पन्नास टक्के कपात केलेले आहे त्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य नाही तरी कर्ज वसुली करणारे एजंट कर्जाचे हप्ते भरण्यास तगादा सुरू केलेला आहे. हे एजंट गुंड प्रवृत्तीचे असून कर्ज वसुलीला आल्यावर अर्वाच्च भाषेचा वापर करतात यामुळे कोरोनाला समोर जायचे कर्ज फेडीला समोर जायचे असा प्रश्न असल्याने कर्जदारासमोर आत्महत्ये शिवाय पर्याय राहीलेला नाही.तरी शासनाने या गोष्टिचा सहानुभुतीने विचार करून न्याय द्यावा.
असे निवेदन दिं०२/०७/२०२० रोजी तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आले.
अनिल साळवे(प.महा.कामगार नेता रि.से.) आनंद बगाडे(पुणे जिल्हा उपाध्यक्ष) मोहन सोनवणे (दौड ता. अध्यक्ष) विशाल माशाळकर (अध्यक्ष जय मल्हार संघटना दौंड) दिपक सोनवणे(शहर अध्यक्ष राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभाग)