दौंड पोलिसांची मोठी कामगिरी सोलापूर जिल्ह्यातील कुख्यात तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Read Time1 Minute, 36 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव


दौंड:-सोलापुर जिल्ह्यातील सलगर वस्ती पोलीस स्टेशन सोलापुर शहर येथील कुख्यांत गुन्हेगार विनायक उर्फ बटल्या गौतम शिंघे वय 24 वर्ष हा जबरी चोरी करून वैजापुर मधुन पसार झाला होता. बरेच दिवस सोलापुर पोलीस त्यांच्या मागावर होते पण तो पोलीसांना गुंगारा देत होता. तरी दिं. 27/08/2020 रोजी तो दौंड येथे येणार असल्याची माहीती दौंड पोलीसांना मिळाल्याने तात्काळ पो.निरिक्षक श्री. सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शना खाली पो.हवा.श्री. असिफ शेख, पो.हवा. पांडूरंग थोरात, पो.कॉ.श्री.किरण राऊत,पो.कॉ.श्री.अमोल देवकाते,पो.कॉ.श्री अमोल गवळी, पो.कॉ.श्री.रवि काळे यांनी महाराणा हॉटेल जवळ सापळा रचुन त्याच्या मुसक्या आवळल्या. व पुढील कारवाई साठी सोलापुर शहर पोलीसांच्या ताब्यात दिले. सदर कारवाई मुळे दौंड पोलीसांच्या कामगीरीवर दौंड मधिल जनता समाधान व्यक्त करत आहे. व वरीष्ठांनी सुध्दा शाबासकी दिली आहे

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील जगदाळे वस्तीचे(कोंगाड गल्ली) नामकरण जय भिम नगर असे करण्यात आले

Read Time1 Minute, 5 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(दि 27)-दौंड शहरालगत असलेली लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील जगदाळे वस्ती(कोगाड गल्ली) या वस्तीला नाव आता जयभिम नगर असे देण्यात आले अशी माहिती श्री.धरम (पप्पू) बनसोडे (जोशाबा प्रतिस्थान अधक्ष)यांनी दिली. या नामफलकाचे उदघाटन श्री.नागसेन धेंडे(RPI, चे जेष्ठ नेते)यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.पांडुरंग गडेकर यानी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला श्रीकांत साळवे,विशाल पाळेकर(प.महा.कामगार अध्यक्ष),राजुभाई शेख,श्री.भाऊसाहेब रंधवे,शिलाताई चितारे (ग्राम पंचायत सदस्य)उपस्थित होते.श्री.मधुकर लोंढे(जेष्ठ नेते)यानी आभार मानले.

6 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

विद्यार्थ्यांना झालेल्या अमानूष मारहाणीचा निषेध करत अब्दुल सत्तार व उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी….

Read Time1 Minute, 56 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी) काल दिनांक 26 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे येथील कार्यकर्ते राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत भेटण्यास गेले असता त्यांनी भेट देण्यास नकार दिला. म्हणून परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केले. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
याच्या निषेधार्थ अभाविप चाळीसगाव तर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांचे विविध मागण्या पूर्ण करण्याची व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना अभाविप चाळीसगाव तालुका प्रमुख सारंग पाटील, शहरमंत्री शुभम जोशी, मनोज कापडणे, अभिषेक शेंडे, क्षुधांत पाटील, सागर पाटील, ऋत्विक पाठक, स्वप्निल वाघ, प्रवीण माळी, मयुर देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ,दौंडकरांनो काळजी घेण्याची गरज…

Read Time1 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड शहराच्या चिंतेत वाढ कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ.
उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 21/08/2020 रोजी 50 रूग्णांचे घशातील स्राव तपासणी साठी पुणे येथे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट आज दिं. 22/08/2020 रोजी प्राप्त झाले. त्या
पैकी एकूण 15 रूग्ण पॉजीटिव्ह आले आहेत. त्यामध्ये पाच पुरूष व दहा महीलांचा समावेश आहे.
दौंड शहर :-04
ग्रामीण:- 10, एस आर पी एफ 07 :-1 ,शालिमार चौक:-1,भवानी नगर:-1,बालाजी नगर:-1,बोरावके नगर:-4,जगदाळे वस्ती:-3,
साठे नगर:-1,सावरकर नगर:-3
Srpf 7:-1 असे एकुण 15 रूग्ण आहेत.
रूग्ण हे 02 ते 63 वर्ष वयोगटातिल आहेत अशी माहिती डॉ.संग्राम डांगे (वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णाल दौंड) यांनी दिली.

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

रुग्ण हक्क परिषदेच्या विधिमंडळ कामकाज सचिवपदी मधुकर पारसे तर मंत्रालयीन सचिवपदी शाहरूख मुलाणी यांची नियुक्ती

Read Time1 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

मुंबई – रुग्णांच्या हक्कांची चळवळ उभी करणारी आंदोलक संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद अल्पावधीतच नावारूपाला आली आहे, सामाजिक विषयांवरील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद सातत्याने कार्यरत आहे. शासनदरबारी अनेक प्रलंबित असलेले विषय, विधिमंडळ आणि मंत्रालयीन कामकाजात पाठपुरावा करण्याचे काम अनेक दिवसांपासून करत असणारे रुग्ण हक्क परिषदेचे मुंबईस्थित पदाधिकारी मधुकरराव पारसे यांची विधिमंडळ कामकाज सचिवपदी तर मंत्रालयीन सचिव पदी मुंबईतीलच शाहरुख मुलाणी यांची निवड रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
मूळचे माळशिरस, जि. सोलापूर येथील मधुकर पारसे यांना मंत्रालय – विधिमंडळ कामकाजाचा गेली १८ वर्षे प्रदीर्घ अनुभव आहे. गेली वर्षभर रुग्ण हक्क परिषदेत ते कार्यरत आहेत. आज त्यांची विधिमंडळ कामकाज महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली तर मंत्रालयातील पत्रकारितातेत अभ्यासू मांडणी करणारे शाहरुख मुलाणी यांची मंत्रालयीन सचिव पदी महाराष्ट्र प्रदेश कमिटीत नियुक्ती केली आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड-युनायटेड ख्रिश्चन दफनभूमी,ख्राईस्ट चर्च दफनभूमी आणि नवगिरे चर्च (मीरा सोसायटी ) येथील लोखंडी प्रवेश गेटचे काम पूर्ण

Read Time51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड-युनायटेड ख्रिश्चन दफनभूमी,ख्राईस्ट चर्च दफनभूमी आणि नवगिरे चर्च (मीरा सोसायटी ) येथील लोखंडी प्रवेश गेटचे काम पूर्ण झाले आहे. श्री.राजेश गायकवाड (गटनेते दौंड न.पा.) यांनी दाैंड नगरपरिषदेकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे तरी यासाठी लागणारा निधी कमी पडला असता उर्वरित निधीची व्यवस्था स्वखर्चातुन ठेकेदाराला दिले व काम पूर्ण करून घेतले असे श्री.राजेश सुरेश गायकवाड (गटनेते .दौ.न.पा.) यांनी सागितले आहे.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

रिपाइं (A) व DBN ग्रुप दौंड च्या वतीने भारतीय संविधान व DBN सन्मानपत्र देऊन 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Read Time1 Minute, 28 Second


अधिकार आमचा न्यूज नेेेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड- दि 20/8/2020 रोजी
10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मा राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने
भारतीय संविधानाची प्रस्थाविका वाचून कार्यक्रमाची सुरुवात झाली व भारतीय संविधान व भारतीय संविधान प्रस्थाविका व DBN सन्मानपत्र मा गट शिक्षणाधिकारी व विस्तार शिक्षणाधिकारी हिंगणे साहेब व कक्ष अधिकारी कुंभार साहेब व तिखे साहेब यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम रिपाइं (A आंबेडकर) व DBN ग्रुप संघटनेचे अध्यक्ष आयु सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात व शशांक गायकवाड विजय कुमार शिंदे प्रवीण धर्माधिकारी सचिन कोरे चंद्रकांत कांबळे अक्षय गायकवाड राम ठाणेदार भीमसेन कोरी अभय भोसले अनिकेत रणसिंग यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समिती दौंड येथे पार पडला.

5 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड शहरातील वोडाफोन व आयडिया कंपनीचे ग्राहक बोगस नेटवर्कमुळे त्रस्त….

Read Time1 Minute, 27 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड शहरातील वोडाफोन व आयडिया कंपनीचे ग्राहक बोगस नेटवर्कमुळे त्रस्त.
दौंड शहरामध्ये आयडिया व वोडाफोन कंपनीचे मोबाईल सिमकार्ड ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत परंतू गेली दोन ते तिन महीने झाले या कंपन्याग्राहकांना व्यवस्थित सेवा देत नाहीत. कस्टमर केअरला फोन केला तर उडवा उडवीची उत्तर देतात,४जी स्पीड चें दर घेऊन आणि २ जी चे नेटवर्क सुद्धा मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे,कधी कॉल ड्रॉप,कधी नेटवर्क नाही,कधी कॉल लागत नाही अश्या अनेक समस्या ग्राहकांच्या समोर उभ्या आहेत मात्र नंबर 1 म्हणणाऱ्या कंपन्या जर असे करत असतील तर ग्राहकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो,या समस्येने ग्राहक हैरान झाले आहे.,ग्राहकांचा कल आता सिमकार्ड कंपनी बदलन्याकडे (पोर्टबिलिटी) जास्त वाढला आहे. अशा दौंड शहरातील नागरीकांचे म्हणने आहे.

प्रतिकात्मक चित्र
7 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड पोलीस ठाणे हद्दीतून गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 15 लोकांना पोलीस अधीक्षक यांनी केले तडीपार

Read Time3 Minute, 17 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड पोलीस ठाणे अंतर्गत आता सर्व गुन्हेगारांचे क्राइम रेकॉर्ड अद्यावत करण्यात दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले की तात्काळ तडीपार कारवाई करण्यात येते दौंड पोलीस ठाणे हद्दीतून मागील वर्षात जवळजवळ चाळीस लोकांना एक वर्षाकरता तडीपार करण्यात आलेले आहे 2020 मध्ये सुद्धा तडीपार प्रस्ताव रवाना झाले होते त्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांनी खालील 15 लोकांना तडीपार केलेले आहे सदर लोकांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे मारामारी,जबरी चोरी, विनयभंग ,दारूविक्री यासारखे गुन्हे दाखल आहेत ,सदर गुन्हेगार परत विनापरवाना दौंड मध्ये दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, त्यानंतर याच लोकांच्या वर पुन्हा झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत किंवा संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल ,यापुढे प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांचे बारीक लक्ष असेल सदर कारवाई श्री. सुनील महाडिक (पोलीस निरीक्षक),सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.ऋषिकेश अधिकारी(सहाय्यक पोलीस निरीक्षक),श्री.भाकरे (सहाय्यक पोलीस फौजदार), श्री.बोराडे (पोलीस नाईक),वारे पोलीस शिपाई ,श्री.वलेकर (पोलीस शिपाई) ,श्री. शिंगाडे (पोलीस हवालदार), श्री.आसिफ शेख (पोलीस हवालदार),श्री.पांडुरंग थोरात (पोलीस हवालदार)श्री.हिरवे (पोलीस हवालदार), श्री.गुंजाळ,श्री. वाघ, श्री.गाढवे श्री.गवळी, श्री.अमोल देवकाते (पोलीस शिपाई) यांनी केली आहे.
तडीपार केलेल्या गुन्हेगारांचे नावे खालील प्रमाणे

तडीपार इसम

 1. दीपक रमेश विधाते
 2. पंकज दिलीप निमजे
 3. जॉय सतीश नवगिरे
 4. शाहिद मोहम्मद शेख
 5. राहुल चन्नाप्पा कमप्लीकर
 6. अजय हनुमंत चन्नूर
 7. लिंगाप्पा अमात्य चूनुर
 8. सोनू नामदेव शेटे
 9. मनोज अण्णाराय नरळे
 10. सुरज विजय होसमाने
 11. सागर अरुण कांबळे
 12. लखन जीवन सरवय्या
 13. सागर कैलास अल्लाट
 14. सुशांत राजू कांबळे
 15. विशाल प्रकाश काटकर
  अशी माहीती श्री.सुनील महाडिक (पोलीस निरीक्षक) दौंड पोलीस स्टेशन यांनी दिली
7 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %