अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी हर्षल पाटोळे,विजय जाधव
दौंड:- अधिकार आमचा या न्यूज चैनल मार्फत रास्त भाव दुकान दारा बद्दल नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या व लेखी तक्रारी अर्जा नुसार काही दुकाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबीत करण्यात आलेली होती परंतु सर्वत्र कोरोनच सावट असताना दौंड तालुक्यातील व शहरांमध्ये रास्त भाव दुकानदार कडून शिधापत्रिका धारकांना वारंवार कमी धान्य देन,पावती न देणे, वेळेवर दुकान न उघडणे , उडवाउडवीची उत्तरे देणे अशा पद्धतीचे नागरिकांच्या पुरवठा विभागात येणाऱ्या लेखी तक्रारी ही गंभीर बाब असून गेल्या चार महिन्या पूर्वी तात्पुरत्या स्वरूपात दुकाने निलंबित करण्यात आली होती परंतु या दुकानाची मा जिल्हा पुरवठा अधिकारी सो पुणे यांनी दौंड तालुक्यातील व दौंड शहरातील 8 रास्त भाव दुकाने कायमस्वरूपी रद्द केलेली आहे अशी माहिती दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
रद्द केलेल्या दुकानांची नावे 1 श्री एम एस लड्डा दौंड 2 डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्राहक भंडार 3 बी जी दरेकर गोपाळवाडी 4 सौ एस आर टेकवडे गोपाळवाडी 5 श्री अशोक एकनाथ साळवे मळद 6 सौ टिके तांबोळी यवत 7 जय अंबिका ग्राहक भंडार सोनवडी 8 प्रथमेश महिला बचत गट सोनवडी
तसेच रद्द केलेल्या दुकानदार पैकी एका दुकानदाराने अधिकार आमचाच्या प्रतिनिधींना खोट्या केस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तोही निष्फळ ठरला.
भविष्यात इतर दुकानदाराकडून अशा पद्धतीचं वर्तन आढळल्यास अशाच पद्धतीची कारवाई होईल . व रद्द केलेल्या दुकानातील शिधापत्रिकाधारकांनी यापुढे स्थलांतरित केलेल्या रास्त भाव दुकानदार कडूनच धान्य घेऊन जावे अशी माहिती दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी दिली